Amalner: ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल चे सीबीएससी इ १०वी व १२वी परीक्षेत १०० टक्के घवघवीत यश
अमळनेर :- तालुक्यातील सर्वं प्रथम सीबीएससी शाळा असलेल्या ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी तालुक्यात सर्व प्रथम येत नावलौकिक मिळविले. आज जाहीर झालेल्या सीबीएससी बोर्ड दिल्ली यांच्या १०वी व १२वी निकालात १०० टक्के घवघवी यश मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला १०वीत प्रथम यश प्रमोद साळुंखे ९३.६० द्वितीय शेख अमरा फातिमा ९३.०० तृतीय प्रणव आनंदा पाटील ८९.२० तसेच १२वीत प्रथम तेजस दिनेश मालकर ८७.२० द्वितीय ओम प्रसन्न पारख ७८.८० तृतीय महेश भगवान पाटील ७४.८० या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून शाळेचे नाव लौकिक केले त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड ललिता पाटील सचिव प्रा श्याम पाटील संचालक पराग पाटील देवश्री पाटील प्राचार्य विकास चौधरी, शिक्षक वृंद व पालकांनी अभिनंदन करत कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या






