Amalner: देवगाव- देवळी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कल्पनाबाई पाटील(माळी)
अमळनेर : देवगाव- देवळी येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
देवगाव- देवळी येथील ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून सरपंच पद हे रिक्त होते. यासाठी 11 मे 2023 रोजी निवडणुक घेण्यात आली. सरपंच पदासाठी सौ. कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने अध्यासी अधिकारी पी. एस. पाटील यांनी सौ. कल्पनाबाई चंद्रभान पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड घोषीत केली. निवडणुकीकामी तलाठी प्रथमेश पिंगळे, ग्रामसेवक कमलेश निकम, सुभाष भोई, कोतवाल गोकुळ बैसाणे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष बैसाणे, सरलाबाई पाटील, आनन भिल, मंदा पाटील, वैशाली पाटील, अनिता मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंचांचा महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे उपाध्यक्ष शिवाजी महाजन,मयूर पाटील,भटू माळी,श्रीकृष्ण माळी,शाम माळी,निलेश पाटील आदी ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.






