India

Fact Check: गोळ्यांच्या पाकिटावर लाल रेष का असते..? जाणून घ्या कारण…

Fact Check: गोळ्यांच्या पाकिटावर लाल रेष का असते..? जाणून घ्या कारण…

बऱ्याचदा असं होतं की आपण आजारी पडलो की आपल्याला माहित असलेली औषधं आपण घेतो आणि डॉक्टरकडे जाणं टाळतो. तसेच आपण सरास आपल्या जवळच्या मेडीकलमध्ये जातो आणि तेथून आपल्याला माहित असलेली औषधं घेतो. परंतू तुम्हाला महितीय डॉक्टरांच्या सल्याशिवाय घेतलेले औषधं किती धोकादायक ठरु शकतात? परंतु लोक या गोष्टींबाबत फारसे गंभीर नाहीत.
आपण घेतलेल्या गोळ्या किंवा औषधाची फक्त एक्सपायरी डेट तपासतो आणि ती घेतो आपण आतापर्यंत इतकंच जागरुक आहोत. परंतू तुम्हाला माहितीय का की आणखी एक अशी गोष्ट आहे जी खाण्यापूर्वी तपासणे खूप महत्वाचे आहे.
ही गोष्ट म्हणजे गोळ्यांच्या पाकीटावरील लाल रंगाची रेष. आपण बऱ्याच पॅकिटांवर ही लाल रेष पाहिली असेल, परंतू ही लाल रेष कशासाठी असते याबद्दल फारच कमी लोकांना ठावूक असेल.
अनेकांना ही लाल रेष पाहून वाटतं की ते अगदी सामान्य आहे किंवा कंपनीची डिझाइन असावी. परंतू तसं नाही. प्रत्यक्षात, त्या ओळीत खूप महत्वाचे कार्य आहे, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. एक्सपायरी डेटप्रमाणेच हा बार तुम्हाला औषधाविषयीच्या सर्वात महत्वाची बाब सांगतो.
अनेकदा लोक थोडे आजारी पडले, ताप, सर्दी-खोकला झाला तर डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकल स्टोरमध्ये जाऊन कशाचाही विचार न करता औषधे खरेदी करतात. काही वेळा या औषधांनी आराम मिळतो सुद्धा, पण काही वेळा याचे गंभीर परिणामही भोगावे लागतात. तुम्ही कधी लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की, गोळ्यांच्या स्ट्रीपवर लाल रंगाची रेष असते. पण याचा अर्थ काय होतो हे माहीत आहे का? नाही ना? चला जाणून घेऊन या लाल रेषेचा अर्थ….

लाल रंगाच्या या रेषेबाबत डॉक्टरांना चांगलं माहीत असतं. पण सर्वसामान्य लोकांना याची काहीच माहिती नसते. अशात लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध मेडिकलमधून घेतात आणि नंतर त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ना हे औषध विकलं जाऊ शकत ना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करता येत. अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.
लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्यांबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही गोळ्यांच्या पाकिटांवर Rx असं लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ असा होतो की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.
तर औषधांच्या ज्या पाकिटांवर NRx लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा होतो की, हे औषध घेण्याचा सल्ला फक्त तेच डॉक्टर देऊ शकतात ज्यांना नशेच्या औषधांचं लायसन्स असतं.
काही औषधांच्या पाकिटांवर XRx लिहिलेलं असतं आणि याचा अर्थ होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांकडूनच घेतलं जाऊ शकतं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये खरेदी करू शकत नाहीत. भलेही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली असेल.अनेकदा लोक थोडे आजारी पडले, ताप, सर्दी-खोकला झाला तर डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकल स्टोरमध्ये जाऊन कशाचाही विचार न करता औषधे खरेदी करतात. काही वेळा या औषधांनी आराम मिळतो सुद्धा, पण काही वेळा याचे गंभीर परिणामही भोगावे लागतात. तुम्ही कधी लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की, गोळ्यांच्या स्ट्रीपवर लाल रंगाची रेष असते. पण याचा अर्थ काय होतो हे माहीत आहे का? नाही ना? चला जाणून घेऊन या लाल रेषेचा अर्थ….
लाल रंगाच्या या रेषेबाबत डॉक्टरांना चांगलं माहीत असतं. पण सर्वसामान्य लोकांना याची काहीच माहिती नसते. अशात लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध मेडिकलमधून घेतात आणि नंतर त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
गोळ्यांच्या स्ट्रीपवर असलेल्या लाल रंगाच्या रेषेचा अर्थ असा होतो की, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ना हे औषध विकलं जाऊ शकत ना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय याचा वापर करता येत. अ‍ॅंटी-बायोटिक औषधांचा चुकीच्या पद्धतीने होणारा वापर रोखण्यासाठी गोळ्यांच्या स्ट्रीपवर ही लाल रंगाची रेष काढलेली असते.
लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्यांबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही गोळ्यांच्या पाकिटांवर Rx असं लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ असा होतो की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.
तर औषधांच्या ज्या पाकिटांवर NRx लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा होतो की, हे औषध घेण्याचा सल्ला फक्त तेच डॉक्टर देऊ शकतात ज्यांना नशेच्या औषधांचं लायसन्स असतं.
काही औषधांच्या पाकिटांवर XRx लिहिलेलं असतं आणि याचा अर्थ होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांकडूनच घेतलं जाऊ शकतं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये खरेदी करू शकत नाहीत. भलेही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली असेल.

भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने 2016 मध्ये ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी लाल पट्टीचा अर्थ काय आहे हे तपशीलवार सांगितले होते.

ज्या औषधांच्या पॅकेटवर लाल पट्टी असते ती डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय घेऊ नयेत. या औषधांमध्ये एंटिबायोटिक्स आहेत. ज्यामुळे त्या केव्हाही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button