Fact Check: तुमचे किती बँक खाते आहेत..? जाणून घ्या याबाबत नियम..!
मुंबई: गेल्या काही वर्षांपासून देशातील बँकिंग क्षेत्रात बरेच अमुलाग्र बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं आहे. मग ते नेट बँकिंग असो किंवा एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धती असो. नव्या तंत्रज्ञानाच्या जोडीनं बँकिंग क्षेत्रातही सातत्यानं नवी क्रांती घडत असल्याचं पाहायला मिळालं आहे. अगदी खेडोपाड्यांपासून शहरांपर्यंत बहुतांश व्यक्तींकडे बँकेचं खातं असतं, जिथं आपआपल्या परिनं आणि सोयीनं ठेवी जपल्या जातात, आर्थिक व्यवहारांची देवाणघेवाण केली जाते. या साऱ्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
तुमच्याआमच्यापैकी असे अनेकजण असतील ज्यांच्याकडे एकाहून अधिक बँक खाती असतील. यातील काही खाती बंद असतील, काही खात्यांमध्ये क्वचितप्रसंगी व्यवहार होत असतील तर, काहींना आपली नेमकी किती खाती आहेत हेसुद्धा लक्षात नसेल. पण, अशी चूक करु नका.
बँकिंगविषयी बोलू काही….
सहसा बँकेकडून विविध प्रकारची खाती ग्राहक उपलब्ध करून दिली जातात. यामध्ये Saving Account, Salary Account, Current Account, joint Account, PF Account अशा खात्यांचा समावेश असतो. यामध्येही ग्राहक सहसा पैसे वाचवण्याच्या आणि सुरक्षित ठेवण्याच्या हेतूनं Saving Account लाच प्राधान्य देतात. जिथं त्यांना ठेवींवर व्याजही मिळतं.
करंट अकाऊंटकडे व्यावसायिक आणि उद्योजकांचा ओघ असतो. जिथं मोठे व्यवहार केले जातात. तर, नोकरदार वर्गासाठी बँक खास Salary Account ची तरतुद बँकेकडून करण्यात आलेली असते. प्रत्येक खात्यासाठी बँकेकडून त्याच प्रकारचे फायदेही वेळोवेळी पुरवले जातात.
बँक खात्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नसली तरीही, तज्ज्ञांच्या मते एका व्यक्तीकडे तीनहून अधिक Bank Account नसावेत. कारण, अशा वेळी त्या व्यक्तीला बँक खात्यांमध्ये सुसूत्रता राखण्यास बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागतो. अनेकदा किमान रक्कम ठेवण्याच्या नादात मोठ्या आकड्याची रक्कम एखाद्या बँक खात्याच निश्चल राहते. त्यामुळं बँकेत खातं सुरु करताना त्यासाठीची किमान मर्यादा आणि तिथं आसणाऱ्या सुविधा या गोष्टी न विसरता लक्षात घ्या.
एका व्यक्तीकडे किती बँक खाती असावीत?
बँकेकडून पुरवल्या जाणाऱ्या Joint Account मध्ये एकाच वेळी दोन व्यक्ती एकच खातं सुरू करू शकता. महत्त्वाची बाब म्हणजे भारतात एका व्यक्तीची किती बँक खाती असावीत याबाबत कोणतीही मर्यादा नाही. त्यामुळं एका व्यक्तीची एकाहून अधिक किंवा त्याहूनही अधिक बँक खाती असूच शकतात. बँकांच्या धोरणांनुसार तुम्हाला ही खाती सुरु ठेवण्यासाठी त्यामध्ये किमान रक्कम ठेवण्याची अट मात्र पाळावी लागते. काही खाती मात्र याला अपवाद ठरतात.






