Amalner

Amalner: परिवारातला सत्कार नेहमीच प्रेरणादायी….एल.जे.चौधरी संत गजानन महाराज मंदिरात सेवापूर्ती सत्कार समारंभ

परिवारातला सत्कार नेहमीच प्रेरणादायी….एल.जे.चौधरी

संत गजानन महाराज मंदिरात सेवापूर्ती सत्कार समारंभ

अमळनेर परिवारातील लोकांनी केलेला सत्कार हा माझ्या हृदयात राहील व मला प्रेरणादायी राहील ,परिवाराने केलेले सहकार्य मी कधीच विसरू शकत नाही परिवारामुळे माझ्या जीवनात अनेक बदल झालेत..जीवनात अनेक संकट आली पण संकटातून मार्ग सापडला असे अमळनेर येथील दादासाहेब जीएम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात सेवापुर्ती सत्कार प्रसंगी उत्तर देतांना मारवड माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एल.जे चौधरी बोलत होते.
यावेळी संत गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा आर बी पवार यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.
सेवानिवृत्त प्राचार्य एल.जे चौधरी , सागर काळपांडे,किशोर निकुंभ यांचा सत्कार गजानन महाराज सेवा संस्थांनचे अध्यक्ष प्रा. आर बी पवार व महिला वारी प्रमुख सौ ज्योती पवार यांनी शाल श्रीफळ देऊन केला.
नंतर मराठी लाईव्ह न्युजचे संपादक
ईश्वर महाजन व मान्यवर व परिवारातील सदस्य यांनी एल.जे चौधरी यांना सन्मानपत्र व बुक्के देऊन सत्कार केला.
यावेळी आर टी बागुल ,प्रवीण पवार महेश पाटील, संजय साळुंखे,सुधीर चौधरी ,मोहीत पवार सह गजानन परिवारातील महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button