Bollywood

Bollywood Stories:माझी लव्हस्टोरी माझ्यासोबत दफनभूमीत जाईल… अभिनेता सलमान खान…

Bollywood Stories:,माझी लव्हस्टोरी माझ्यासोबत दफनभूमीत जाईल… अभिनेता सलमान खान…

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्याकडे आज संपत्ती, प्रसिद्धी सर्व काही आहे. पण तरी देखील अभिनेता एकटाच आयुष्य जगत आहे. भाईजानच्या आयुष्यात अनेकदा प्रेमाची एन्ट्री झाली. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अभिनेत्री संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांच्यासोबत सलमान याचं नाव जोडण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे आजही सलमान आणि ऐश्वर्या यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगलेली असते. प्रत्येक मुलाखतीत अभिनेत्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले जातात आता देखील सलमान खाल याला त्याच्या लव्हस्टोरबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा अभिनेत्यानं असं वक्तव्य केलं ज्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला.

मुलाखतीत सलमान खान याला त्याच्या अफेअर्सबद्दल विचारण्यात आलं, यावर भाईजान म्हणाला, ‘माझी लव्हस्टोरी माझ्यासोबत दफनभूमीत जाईल…’ प्रेमाबद्दल असं वक्तव्य केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे सलमानच्या चाहत्यांना देखील प्रेमाबद्दल त्याने दिलेलं उत्तर आवडलं आहे…

प्रेमाच्याबाबतीत स्वतःला कमनशिबी म्हणत सलमान खान म्हणाला, ‘ज्यांनी जान बोलवं अशी माझी इच्छा होती, ते आता मला भाई म्हणत आहे… आता मी काय करु तुम्हीच सांगा..’ पुढे अभिनेत्याला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा देवाची मर्जी होईल… लग्नासाठी दोन लोकांची गरज असते…’

लग्नाबद्दल अभिनेता पुढे म्हणाला, ‘कधी माझा होकार होता, तर तिचा नकार… काही कोणी होकार दिला पण माझा नकार होता… आता दोन्ही बाजूने नकार आहे… जर दोन्ही बाजूंनी नकार येत असेल तर… लग्न कसं होईल… पण अद्यापही वेळ आहे. आता मी ५७ वर्षांचा आहे… आता मला असं वाटतं सगळं अंतिम व्हायला हवं.. म्हणजे एक पत्नी असायला हवी…’ असं देखील सलमान खान म्हणाला.

अनेक अभिनेत्रींसोबत भाईजानच्या नावाची चर्चा झाल्यानंतर, अभिनेत्री पूजा हेगडे हिच्यासोबत देखील सलमान खान याच्या नात्याची चर्चा रंगत आहे. पूजा आणि सलमान खान यांनी ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमासाठी एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमाला प्रेक्षकांनी हवं तसं प्रेम दिलं नाही, पण पूजा आणि सलमान यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली.

मोठ्या पडद्याप्रमाणे सोशल मीडियावर देखील सलमान खान कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सलमानच्या प्रत्येक पोस्टवर चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत असतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button