सेवानिवृतीच्या काही तास आधी काळाचा घाला,,तिहेरी अपघाताने शिक्षकाचा जागीच मृत्यु, अपघाती निधनाने दिडोरी निफाड सह जिल्ह्यात शोककळा
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक:- आज होत असलेल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी वणी महाविद्यालयात जात असताना रस्त्यातच काळाने घाला घातला अन् शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. मनमिळाऊ शिक्षकाला रौळस या त्यांच्या मूळगावी अखेरचा निरोप देताना ग्रामस्थाचे अश्रू अनावर झाले होते.
निफाड तालुक्यातील रौळस येथिल रामदास माधव शिंदे (वय ५८) यांचे सोमवारी (दि. २४) सकाळी दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाट्यावर तिहेरी अपघातात अपघाती निधन झाले. ३५ वर्षे मविप्र समाज संस्थेच्या वणी येथील कनिष्ठ महाविद्यालयात ते अध्यापन करीत होते. मंगळवारी (दि. २५) त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होणार होता. याच कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी ते आपल्या कारने नाशिकहून वणीकडे निघाले होते. दररोज सहकाऱ्यांसोबत जाणाऱ्या शिंदे यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमाच्या नियोजनामुळे इतरांना उशीर नको म्हणून ते स्वतःच्या अल्टो एम एच १५ सी एम ४४७४ कारने प्रवास करीत होते. सकाळी सव्वा आठच्या सुमारास ते वलखेड फाट्यावर आले असता समोरून येणाऱ्या एम एच१५ इ जी ५८३० सागर भास्कर पेलमहाले याच्या पिकअपच्या धड़के ने त्यांच्या अल्टो कार सह प्राध्यापक रामदास शिंदे याचा अपघात झाला यात अल्टो कार वाहनाचा चक्काचूर झाला. या घटनेत शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला.पाठीमागुन येणार्या स्पेंलन्डर मोटार सायकल एम एच १५ डी एच ४९३१ विठ्ठल पंढरीनाथ पागे आंबेवणी पाठीमागे धडकुन किरकोळ जखमी झाले वलखेड फाटा येथे टाकण्यात आलेले फायबर स्पीड ब्रेकर खराब व चांगले नव्हते लवकर खराब होवुन ऊखडुन गेल्याने वाहन चालकांच्या लवकर लक्षात यत नसल्यामुळे नव्याने स्पीड ब्रेकर टाकावे अशी मागणी ग्रामस्थ सह वाहनचालकानी केली अजातशत्रू व्यक्तिमत्व, विद्यार्थीप्रिय शिक्षक प्रा. शिंदे मंगळवारी सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑफिशियली विद्याथ्र्यांसह सहकाऱ्यांचा निरोप घेणार होते. पण नियतीने त्यापूर्वीच त्यांना आपलेसे केले.
गेल्या पाच दिवसांपासून कार्यक्रमासंदर्भात प्रा. शिंदे सहकाऱ्यांच्या संपर्कात होते. सर्वांशी नम्रपणाने कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात बोलत होते. कार्यक्रम पत्रिकेतील एक लहानशी चूक प्रा. डॉ. कैलास सलादे यांनी निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी सगळ्या कार्यक्रम पत्रिकाच नव्याने छापून आणल्या होत्या. आपल्या संपूर्ण आयुष्यात नेहमी एकही चूक राहू नये म्हणून ते काटेकोर जीवन जगले. पण, नियतीच्या मनात वेगळेच होते. ३५ वर्षांच्या कारकिर्दीत एकदाही बदली न झालेले एकमेव प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती. हे सांगताना त्यांना अभिमान वाटायचा. सोमवारी अखेरचा निरोप देताना प्रत्येक ग्रामस्थाला हुंदका अनावर झाला होता.






