Amalner

Amalner: ओम पाटील ने विभागीय स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक

Amalner: ओम पाटील ने विभागीय स्पर्धेत पटकाविले सुवर्णपदक

अमळनेर येथील जी.एस.हायस्कूल चा विद्यार्थी ओम डिंगम्बर पाटील याने नाशिक येथे झालेल्या आंतरशालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
नाशिक येथे ९ एप्रिल रोजी झालेल्या विभागीय आंतरशालेय स्पर्धेत येथील जी.एस.हायस्कूल चा इयत्ता १० वि चा विद्यार्थी ओम डिंगम्बर पाटील याने १७ वर्ष आतील पावरलिफ्टिंग स्पर्धेत तीनही प्रकारात १३० किलो वजन उचलुन सुवर्णपदक पटकाविले असून मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.प्रशिक्षक ईश्वर महाजन यांनी त्याला मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल शाळेचे चेअरमन योगेश मुंदडे यांनी ओम पाटील याचे अभिनंदन केले.यावेळी मुख्याध्यापक डी.एच.ठाकूर,उपमुख्याध्यापक आर.एल.माळी, पर्यवेक्षक सी.एस.पाटील,एस.बी.निकम,क्रिडा शिक्षक एस.पी वाघ तसेच दिगंबर पाटील,अमोल येवले, नगरसेवक रामकृष्ण पाटील तसेच शिक्षक व शिककेतर कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button