Amalner: पोलिस विभागातर्फे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत इफ्तार पार्टीचे आयोजन..
अमळनेरला इफ्तार पार्टीत हिंदू मुस्लिम बांधवांनी दिला राष्ट्रीय
एकात्मेचा संदेश….
अमळनेर रमजान ईदच्या निमित्ताने इफ्तार पार्टीचे आयोजन पाचपावली मंदिरा समोर पोलीस कवायत मैदानावर करण्यात आली. रमजान महिन्यात आपले मुस्लिम समाज बांधव यांचा रोजा उपवास असतात. त्याअनुषंगाने हिंदू मुस्लिम समाज एकता म्हणून पाच पावली देवी चौक येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजन करण्यात आले होते.
सदर इफ्तार पार्टीला अमळनेर तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील, मा. पोलीस अधीक्षक, जळगांव एम राज कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर राकेश जाधव आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
हिंदू मुस्लिम बांधवांनी गुण्यागोविंदाने राहावे, आपापल्या धर्माचा सण उत्साहात साजरा करावा, कोणत्याही धर्माच्या सणाचा द्वेष करू नये. दोन धर्मात तेढ निर्माण होणार नाही, व शहरात शांतता नांदेल यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी राष्ट्रीय एकोपा वाढवावा असे पोलीस अधीक्षक एम राज कुमार यांनी सांगितले.
आमदार अनिल भाईदास पाटील म्हणाले की सखाराम महाराजांचा यात्रा उत्सव प्रसंगी रथला मोगरी लावण्यासाठी मुस्लिम बांधवांना मान मिळतो. त्यामुळे यात्रा रथ
उत्सवात सर्व समाज बांधवांचे सहकार्य मिळत असते.
हिंदू मुस्लिम बांधवांनी गुण्यागोविंदाने राहावे, आपापल्या धर्माचा सण उत्साहात साजरा करावा, कोणत्याही धर्माच्या सणाचा द्वेष करू नये. दोन धर्मात तेढ निर्माण होणार नाही, व शहरात शांतता नांदेल यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी राष्ट्रीय एकोपा वाढवावा असे पोलीस अधीक्षक एम राज कुमार यांनी सांगितले.
अनुचित प्रकार घडत नाही यासाठी सर्व समाजातील बांधवांचे व पोलिसांचे सहकार्य
लाभते. मुस्लिम बांधवांना रमजान सणाच्या हार्दिक शुभेच्छांचा संदेश दिला.अमळनेर शहरातील विविध धर्मीयांच्या समाजबांधवांनी उपस्थितीत राहून सामाजिक
एकात्मतेचा संदेश दिला गेला. दुष्काळाचे सावट दूर होऊन, शहरात शांतता नांदावी व सर्वाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सामूहिक दुआ पठण यानिमित्ताने
करण्यात आले. रोजा इफ्तार झाल्यानंतर मौलाना यांनी नमाज पठण केले. त्यानंतर
सर्व रोजेदार व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी विविध
धर्मीय पदाधिकाऱ्यांनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.
तसेच माजी आमदार आणि सर्व नगरसेवक बंधू आणि सर्व शहरातील प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थाचे पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी अमळनेर शहराचे सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉक्टर शरद पाटील यांनी केले.






