Amalner

Amalner: अरे बापरे.. एकाच रात्री एकाच गावात तीन ठिकाणी चोऱ्या..! चोरही एक..cctv त करामत कैद..!

Amalner: अरे बापरे.. एकाच रात्री एकाच गावात तीन ठिकाणी चोऱ्या..! चोरही एक..cctv त करामत कैद..!

अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे एका रात्रीत चोरटय़ाने किराणा दुकान आणि दोन पान टपऱ्या फोडल्याने गावात घबराहट निर्माण झाली आहे. वाढत्या चोऱ्यांच्या अनुषंगाने असून रात्रीची गस्त घालण्याची मागणी होत आहे. सदर चोरट्याची संपूर्ण करामत cctv त कैद झाली आहे.

अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे बस स्टॉप परिसरात रघुनाथ रोकडे यांचे जनरल किराणा व थंड पेय दुकान घराच्या बाहेर आहे. रात्री 1:45 वाजेच्या सुमारास रोकडे कुटुंब घरात झोपले असल्यावर सीसीटीव्ही पहिल्या फुटेज नुसार अगोदर पिवळा टी-शर्ट व काळी जीन्स घातलेला इसम तोंडावर हात लावून आलेला दिसतो. तर दुसरीकडे या टपरी समोरच प्रकाश कोळी यांची पान टपरी आहे. या टपरीचे ही कडी कोंडा तोडून सलाखी वाकवलेली दिसत आहे. या टपरी मधून काही चोरी न झाल्याचे प्रकाश कोळी यांनी सांगितले. परिसरात व गावात चोरीच्या घटना कायम होतच असतात. पोलिसांनी रात्रीच्या वेळी तरी परिसरात गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थ व व्यावसायिक करीत आहेत.

तिसऱ्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये तोच इसम दुकानाचे कुलूप तोडून हातात बॅटरी व टिकाव घेऊन खुर्चीवर चढत कॅमेऱ्याची दिशा बदलवून वरती करतांना दिसत आहे. या वेळी त्याने अंगातील पिवळ्या कलरचा टी-शर्ट कमरेला बांधून डोक्यावर काळा कापड टाकलेला दिसत आहे. यावेळी चोरट्यानी दुकानाची झाडाझडती घेत गल्यातील 700-800 रुपयाची चिल्लर व भारत गॅस कंपनीचे भरलेले सिलेंडर व किरकोळ सामान चोरट्याने चोरून नेल्याचे दुकान मालक रघुनाथ रोकडे यांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत चोरट्यानी समाधान रोकडे यांची बस थांबा जवळ नास्ता व पान टपरी आहे. टपरी फोडून 3000 ते 4000 हजार रोख रक्कम व किरकोळ सामान चोरीला गेला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button