Miss India 2023: कोण होती पहिली मिस इंडिया..? जेलची वारी केलेली..? गरोदर असताना मिळाला मिस इंडिया किताब..!
Miss India 2023 चा किताब १९ वर्षीय नंदिनी गुप्ताला मिळाला. पण नक्की हे कधीपासून सुरू झालं आणि सर्वात पहिली मिस इंडिया नक्की कोण होती. तिने कशा पद्धतीने यात सहभाग घेतला होता आणि तिची स्टाईल कशी होती हे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच अभिमान वाटेल.
कोलकत्यातील एका बगदादी कुटुंबात जन्म झालेल्या एस्थर विक्टोरिया अब्राहमने १९४७ मध्ये झालेल्या पहिल्या Miss India Pageant चा किताब मिळवला होता. तर त्यानंतर प्रमिला या नावाचे त्यांना प्रसिद्धी मिळाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिस इंडिया जिंकताना एस्थरचे वय होते ३१ आणि त्यावेळी ती गरोदर होती.
एका यहुदी उद्योगपतीच्या घरी जन्म झालेल्या एस्थरची आई मूळची पाकिस्तानची होती. घरातील सर्व बंधने तोडून एस्थरने १९४७ च्या भारतात पहिल्यांदाच झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला आणि हा किताब मिळवला. ३१ व्या वर्षी गरोदर असताना तिने हा किताब मिळवल्यामुळे त्याचे अधिक कौतुक झाले होते.
रूढींवर मात करत घडवले नशीब
एस्थरने ज्यावेळी या स्पर्धेत सहभाग घेतला तेव्हा नुकताच भारत स्वतंत्र झाला होता. मात्र महिलांच्या बाबतीतील रूढी आणि मानसिकता स्वतंत्र विचाराचे झाले नव्हते. चार भिंतीच्या बाहेर जाण्याची महिलांना परवानगी नव्हती. पण या गोष्टींची बंधने तोडून चार मुलांची आई आणि पाचव्यांदा गरोदर असताना ही जोखीम एस्थरने उचलली होती आणि तिने नशीब घडवले.
एस्थर एका यहुदी कुटुंबातील असून तिच्यावर घरातून अनेक बंधनं होती. मात्र १७ व्या वर्षीच तिने थिएटरसाठी घर सोडलं. कुटुंबाच्या विरोधात जाऊन तिने थिएटर कंपनीमध्ये काम करायला सुरूवात केली आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील पहिला महिला निर्माती बनली होती.
कपडे आणि दागिने स्वतःच डिझाईन करत असे
अभिनेत्री, निर्माती, डान्सर, स्टंटवुमन या सगळ्याच गोष्टीत एस्थर तरबेज होती. इतकंच नाही तर कपडे आणि दागिने त्याकाळी स्वतःच डिझाईन करण्याचं कामही एस्थरने केले होते. त्या काळात हे सर्व करणे म्हणजे एका वेगळ्या नजरेने पाहिले जायचे. पण त्या सर्वांवर मात करत तिने नाव कमावले होते.
जेलचीही खाल्ली हवा
जेलचीही खाल्ली हवा
भारताच्या पहिल्या मिस इंडियाला पाकिस्तानी गुप्तहेर समजून तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी जेलमध्ये बंद केले होते. व्यक्तीगत आयुष्यात खूपच चढउतार पाहिलेल्या प्रमिलाने मात्र कधीच हिंमत सोडली नाही. तर १९६७ मध्ये तिची मुलगी नाकी जहान मिस इंडिया किताब मिळविण्यात यशस्वी झाली. भारतातील केवळ ही एकच आई-मुलीची जोडी आहे ज्यांना मिस इंडिया पीजंट मिळाला आहे.
९० व्या वर्षी अखेरचा श्वास सोडलेल्या या मिस इंडियाचा जीवन प्रवास हा खूपच चढ-उताराचा असून आयुष्यात दोन लग्न झाली. पहिला नवरा पाकिस्तानला गेल्यामुळे त्यांचं लग्न मोडलं. मात्र भारतात राहून एस्थरने नेहमीच भारताचे नाव मोठे केले.






