Amalner

Amalner: उन्हाचा तडाखा… कब्रस्तानला आग…

Amalner: उन्हाचा तडाखा… कब्रस्तानला आग…

अमळनेर वाढत्या तापमानामुळे तांबेपुरा भागातील मुस्लिम पिंजारी मंसुरी जमात
कब्रस्तानला १९ एप्रिल रोजी दुपारी अचानक आग लागली. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

कब्रस्तानला आग लागताच माजी नगरसेवक मुक्तार खाटीक यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना माहिती कळवून अग्निशमन दल बोलवण्यात आले. दल प्रमुख नितीन खैरनार यांच्या पथकाने तातडीने आग विझवली. बोरी नदी काठी कोरडी झुडपे, गवत असल्याने आग पसरत होती. विजय पाटील यांच्या शेताला आग लागत असताना वेळीच आग आटोक्यात आणली. बाजूला असलेल्या ठाकरसिंग महाराजांच्या आश्रमालाही आग लागू शकली असती. परंतु आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्या मुळे मोठी हानी टळली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button