Amalner

Amalner: न प ने हटवले बाजार पट्ट्यातील अतिक्रमण..!

Amalner: न प ने हटवले बाजार पट्ट्यातील अतिक्रमण..!

अमळनेर पालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबवून बालेमिया ते सुभाष चौक रस्ता मोकळा करून सिंधी बाजार, आठवडे बाजारातील शेड, बोर्ड हटवण्यात आले.

शहरातील लालबाग, लुल्ला मार्केट, सिंधी बाजार, आठवडे बाजार, कुंटे रोड इ ठिकाणी मुख्य बाजार भरतो मात्र हातगाड्या, वाढीव शेड, ओटे यांचे अतिक्रमण वाढल्याने नागरीकांना गैरसोय होत होती. या संदर्भातील अनेक तक्रारी देखील नगरपरिषदेला करण्यात आल्या होत्या. या पाशर्वभूमीवर अखेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आणि पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी संयुक्तपणे कठोर मोहीम राबवण्यासाठी पथक नेमले.

अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, जगदीश बिहाडे, विशाल सपकाळे, अविनाश बिऱ्हाडे, विकास बिऱ्हाडे, सुरेश चव्हाण, जयदीप गजरे, भूषण चव्हाण, जितेंद्र चावरीया सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोकॉ लक्ष्मीकांत शिंपी, योगेश बागुल, शेखर साळुंखे यांचा या पथकात समावेश होता. समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button