Rawer

खिर्डी बु! येथे चितळाच्या मृत्यूने खळबळ..घटनास्थळी वनविभागातील अधिकारी कर्मचारी दाखल..!

खिर्डी बु! येथे चितळाच्या मृत्यूने खळबळ..घटनास्थळी वनविभागातील अधिकारी कर्मचारी दाखल..!

खिर्डी /प्रतिनिधी प्रविण शेलोडे

रावेर तालुक्यातील तापी किनार पट्यात खिर्डी बुद्रुक येथे रात्री तसेच पहाटेच्या सुमारास नर जातींचे साधारण 10 ते 12 वर्ष वयाचं चितळ हा वन्य प्राणी मृत्युमुखी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे . मृत्यूमुखी पडलेला चितळ हा रहदारी भागात सापडल्याने या भागातील जनतेत अनेक चर्चेला उधाण आल्याचे चित्र दिसून येत आहे.
खिर्डी बुद्रुक ऐनपुर रोड लागत नर प्रजातीतील चितळ हा रहदारी भागात आलाच कसा? का याला कोणी आणले की काय ? कोणी शिकार तर केली नाही ना? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे.रात्री किंवा पहाटे च्या सुमारास हा चितळ रहदारी भागात आल्याने कुत्र्यांनी त्याला चावा दिल्याचे एका सी सी कॅमेर्‍यात ही दिसून येत असल्याचे वन्यजिव चे कापसे यांनी सांगितले.तसेच सदर मृत चीतळाची शेपूट ही गायब असल्याचे प्रथम दर्शनी पाहायला दिसुन येत आहे.नागरिकांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली नंतर तत्काळ वनविभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून लोहारा बिटचे वनरक्षक युवराज मराठे यांनी पंचनामा केला असून या प्रसंगी पाल येथील वनपाल डी जे.रायसिंग, रावेर वनपाल रवी सोनावणे, वनपाल राजेंद्र सलदार ,निंभोरा पोलिस स्टेशन चे सपोनि.गणेश धुमाळ यांनी घटनास्थळी भेट दिली.पुढील तपास रावेर परिक्षेत्र अधिकारी अजय बावने करित आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button