Bollywood IPL: साल 1962..! दोन दिग्गज अभिनेत्यांमध्ये झालेला क्रिकेट सामना… झाला होता ह्या कारणासाठी..!
सध्या देशभरात IPL ची धूम दिसून येत आहे. सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण आयपीलमध्ये मग्न झाले आहेत. अनेक कलाकार आपल्या आवडत्या टीमला आणि खेळाडूला उघडपणे पाठिंबा देत सोशल मीडियावरुन प्रोत्साहन देत आहेत.दरम्यान बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं नातं फारच जुनं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आयपीलच्या या फिव्हरमध्ये एक फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार आणि राज कपूर यांचा आहे. या फोटोमध्य दोघेही क्रिकेट खेळताना दिसून येत आहेत.बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं फारच जुनं आहे असं नेहमीच म्हटलं जातं. कारण सतत क्रिकेटर्स आणि सेलिब्रेटी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने एकमेकांच्या संपर्कात येताना दिसून येतात.
कधी क्रिकेटर्स मैदान सोडून अभिनयात हात अजमावताना दिसून येतात तर कधी अभिनेते क्रिकेटच्या मैदानात आपली आवड जोपासताना दिसून येतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हिंदी सिनेसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार दिलीप कुमार आणि राज कपूर एकत्र दिसून येत आहेत.या फोटोबाबत सांगायचं झालं तर या अभिनय क्षेत्रातील दोन दिगज्जांनी एकत्र क्रिकेटचा सामना खेळला होता. या सामन्यादरम्यानचा हा फोटो आहे. हा फोटो पाहून दोन्ही कलाकारांचे चाहते प्रचंड खुश होत आहेत. सोबतच या सर्वांच्या मनात असा प्रश्नही निर्माण झाला आहे की, या कलाकारांनी हा सामना कधी खेळला असावा? आणि का खेळला असावा? तर आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
दिलीप कुमार आणि राज कपूर यांचा हा फोटो 1962 सालचा आहे. 1962 मध्ये हा धमाकेदार सामना खेळण्यात आला होता. या मैत्रीपूर्ण सामन्यासाठी दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या टीम समोरा-समोर आल्या होत्या. याच सामन्यामधील हा एक सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता.
हा सामना फक्त खेळ म्हणून नव्हे तर एका सामाजिक भावनेच्या हेतूने ठेवण्यात आला होता. या क्रिकेटच्या सामन्यामागचा हेतू जाणून तुम्हालाही कौतुक वाटेल. हा सामना सिने कामगारांसाठी निधी जमा करण्याचा उद्देशाने घेण्यात आला होता. यामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते मेहमूद, शशी कपूर, शम्मी कपूर, प्रेमनाथ, जॉय मुखर्जी असे अनेक कलाकार सहभागी झाले होते.







