Mollywood: खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे आणि अमृता खानविलकर विवाहबद्ध…
खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे हे सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांचे लक्ष असते. नुकतीच अमोल कोल्हे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
खासदार अमोल कोल्हे यांनी लिहलेली पोस्ट काय आहे?अमोल कोल्हे यांनी एका वृत्तपत्रामधील बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. खासदार अमोल कोल्हे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांचे लवकरच लग्न होणार असल्याचं या बातमीमध्ये लिहिलेलं आहे.या बातमीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करुन अमोल कोल्हे यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘हा कोणता पेपर आहे ठाऊक नाही पण शेवटच्या ओळीतील क्रिएटिव्हिटी.. काय बोलावं? नशीब बायकोला आज 1 एप्रिल आहे हे माहित होतं, नाहीतर संपादक महोदयांकडे जेवणाची सोय करावी लागली असती!’ अमोल कोल्हे यांच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अनेकांनी त्यांच्या या पोस्टवर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.






