World

Twitter New Logo : ट्विटरची चिमणी उडाली भुर्रर्र… ट्विटरमध्ये सर्वात मोठा बदल…

Twitter New Logo : ट्विटरची चिमणी उडाली भुर्रर्र… ट्विटरमध्ये सर्वात मोठा बदल…

ट्विटरची (Twitter) सूत्र इलॉन मस्क यांच्याकडे आल्यापासून कंपनी सतत चर्चेत आहे. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची छाटणी, अनेक कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कपात करणे किंवा ब्लू टिक बाबतचे अनेक निर्णय यामुळे ट्विटर आणि इलॉन मस्क सतत चर्चेत राहिले. आता पुन्हा ट्विटर चर्चेत आलं आहे. कारण इलॉन मस्क यांनी आता ट्विटरच्या लोगोमध्ये मोठा बदल केला आहे.

ट्विटरची ओळख असलेला निळा पक्षी (Blue Bird) आता गायब झाला आहे. नव्या बदलानंतर अनेकजण चकित झाले. ट्विटरने ‘डॉज’ हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे.
सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला होता. मात्र हा एरर आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर काही वेळातच #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागला. ट्विटर हॅक झालं की काय असं अनेकांना वाटत होतं. मात्र यानंतर काही वेळातच इलॉन मस्कने एक ट्विट करुन ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)
ट्विटरच्या लोगो बदलानंतर इलॉन मस्क यांनी मजेशीर ट्वीट केलं आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी ड्रायव्हिंग लायसन्स तपासत आहे. या पोलिसाने ब्लू बर्डचा फोटो हातात धरला आहे. तर गाडीत बसलेला कुत्रा सांगत आहे की ‘हे जुने चित्र आहे.’
डोज लोगो काय आहे?

इलॉन मस्क यांनी ट्विटरचा लोगो का बदलला हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉज इमेज शिबू इनू आणि डॉजकॉइन ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचे प्रतीक आणि लोगो आहे. 2013 मध्ये इतर क्रिप्टोकरन्सीसमोर एक गमंत म्हणून ही करन्सी लॉन्च केली होती.

सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला होता.
खरंतर हा ‘डॉज’ डॉजकॉइन क्रिप्टोकरन्सीचा आयकॉन देखील आहे. एलॉन मस्क डॉजकॉइनच्या समर्थकांपैकी एक आहे. मीम्समध्ये हा ‘डॉज’ तुम्ही अनेकदा पाहिला असेल. मस्क यांनी फेब्रुवारीमध्येच लोगो बदलण्याचे संकेत दिले होते. त्यांनी ट्विटरवर बॉस म्हणून ‘डॉज’चा फोटो शेअर केला आणि नवा सीईओ उत्तम असल्याचे लिहिले होते. तेव्हापासूनच या संदर्भात अंदाज व्यक्त होत होते. आता ट्विटरवर आणखी मोठे बदल पाहायला मिळतील अशी अटकळही बांधली जात होती. आता हे प्रत्यक्षात आले असून ट्विटरचा नवा लोगो अस्तित्वात आला आहे.
जपानमधील सकुरा येथे राहतो डॉज काबोसू

ट्विटरचा लोगो बदलल्यानंतर डॉजकॉइनने ट्विट करून या कुत्र्याचे नाव काबोसू असल्याचे नमूद केले. तो जपानमधील साकुरा येथे मालक अत्सुको सातोसोबत राहतो. अत्सुको सातोने 2010 मध्ये तिच्या ब्लॉगवर काबोसूचे फोटो अपलोड केले होते. नंतर, बिटकॉइन सारख्या इतर क्रिप्टोकरन्सींवर मजा घेण्यासाठी त्याची चित्रे मीम्समध्ये वापरली गेली. काबोसू हा एक रेस्क्यू डॉग आहे, असे डॉजकॉइनने नमूद केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button