जानोरी गावात रामनवमी निमित्त 21 फुटी धनुष्याचे मिरवणूक.
सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी – तालुक्यातील जानोरी येथील प्रभू श्रीरामांचे इतिहासकालीन मंदिर आहे येथे दरवर्षी रामनवमी साजरी होत असते परंतु या वर्षी पहिल्यांदा आयोद्यात राम मंदिर उभे राहणार असून आपल्या हिंदूसाठी ही गर्वाची गोष्ट असून अशा अभूतपूर्व आनंदात सहभागी होण्यासाठी जानोरी गावतील ग्रामपंचायत व राममंदिर ट्रस्ट यांनी पुढाकार घेऊन या वर्षी भव्य 21 फुटी प्रभू श्रीरामाच्या धनुष्याची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला यात महत्त्वपूर्ण योगदान जानोरी गावचे प्रसिद्ध अंतर राष्ट्रीय चित्रकार सुभाष भाऊ वाघ यांच्या संकलपनेतून 21 फूट धनुष्य तयार करून त्याची भव्य मिरवणूक जानोरी गावातील इतिहासात पहिल्यांदा काढण्यात आली त्यामुळे गावातील सर्व नागरिकांना खूप आनंद झाला सर्वांनी ग्रामपंचायत चे आभार मानले तसेच या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणत गावातील नागरिकांनी तरुणांनी सहभाग घेतला होता त्यापैकी जानोरी गावचे सरपंच सुभाष नेहेरे उपसरपंच हर्षल काठे योगेश तिडके तंटामुक्ती चे रेवचंद वाघ सदस्य गणेश तिडके ग्रामपंचायत सदस्य विलास काठे,पपू वाघ,भारत काठे,शरद काठे,सर्व राम मंदिर ट्रस्ट बैरागी परिवार संजय बैरागी नरेंद्र बैरागी आदी सह रवी सूर्यवंशी,ज्ञानेश्वर विधाते,विकास केंग,सर्व तरुण मित्र मंडल यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता
प्रतिक्रिया -सुभाष वाघ अंतरराष्ट्रीय चित्रकार जानोरी गावाला प्रभू रामचंद्र यांचा सहवास लाभला रामनवमीनिमित्त प्रभू रामचंद्रांच्या धनुष्याची मोठी प्रतिकृती बनवण्याची माझी इच्छा होती त्यांच्या मदतीने पूर्ण झाली






