Amalner: जैन सोशल ग्रुप तर्फे सप्तशृंगी देवीच्या गडावर जाणाऱ्या भाविकांना जलपेयाचे वाटप…
अमळनेर येथील जैन सोशल ग्रूपतर्फे गडावर पायी जाणाऱ्या भाविकांना सेवा भावनेतून थंड पाणी आणि चॉकलेट वाटप करून सेवा देण्यात आली.
तालुक्यातील जानवे गावाजवळ ही सेवा देण्यात आली यात 1300 ते 1400 भक्तांपर्यंत जैन सोशल सेवाभावी उपक्रम राबविला. यात ग्रूपचे अध्यक्ष देवांग शाह, सेक्रेटरी सौरभ छाजेड़, राजेश बेदमुथा, पूनम कोचर, निखिल पारख, रोनक पारख, आनंद कवाड़, प्रितेश पारख, प्रितेश खिवसरा, अक्षय ब्रमेच्छा, कल्पेश झाबक आदी उपस्थित होते. छोट्या मुलांनी देखील या उपक्रमात सहभाग घेतला.यात विस्मया छाजेड़, भूमित छाजेड़, क्रिनय कवाड़ उपस्थित होते






