Bollywood: अरे बापरे..! अमितजी किती वेळा “विजय”…? 22 वेळा..?
मुंबई अमिताभ बच्चन यांचा 1973मध्ये आलेला जंजिर सिनेमा अँक्शन थ्रिलर सिनेमा होता. हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा भारतात आर्थिक व्यवस्थेची गणित हलली होती. भ्रष्टाचारानं त्रस्त झालेल्या सामान्य माणसांची निराशा त्यांचा संताप जंजीर सिनेमात दाखवण्यात आला होता. हिंदी सिनेमात रोमान्स सोडून इतक्या रागानं संतप्त झालेला नायक म्हणून अमिताभ बच्चन समोर आले. या सिनेमातून बॉलिवूडला विजय हे पात्र मिळालं. त्यानंतर हे नाव आणि अमिताभ बच्चन इतके हिट झाले की पुढच्या जवळपास 22 सिनेमात बिग बींच्या पात्रांच नावं “विजय” होत.
बिग बींनी मागील 50 वर्षांमध्ये अनेक जॉनरचे सिनेमे केले. ‘सात हिंदुस्तानी’ ते ‘गुडबाय’ पर्यंत प्रत्येक सिनेमात अमिताभ बच्चन यांचा एक वेगळा रंग पाहायला मिळाला. ‘जंजीर’ सिनेमा बिग बींनी ‘इन्स्पेक्टर विजय खन्ना’ ही भूमिका साकारली होती
त्यानंतर 1974मध्ये आलेल्या ‘रोटी कपडा और ‘मकान’, 1976मध्ये आलेल्या ‘हेरा फेरी’ आणि 1978मध्ये आलेल्या ‘डॉन’ सिनेमात बिग बींनी साकारलेल्या पात्राचं नाव ‘विजय’ होतं.
इतकंच काय तर 1986 मध्ये आलेल्या ‘आखिरी रस्ता’, 1998मधील ‘दो और दो पांच’ या सिनेमातही त्यांचं नाव विजय होतं.
बिग बी अमिताभ बच्चन यांनी 1978मध्ये आलेल्या ‘त्रिशूल’ सिनेमात ‘इन्स्पेक्टर विजय कुमार’ साकाला तर 1979मध्ये आलेल्या ‘द ग्रेट ग्लॅम्बर’मध्येही ‘इन्स्पेक्टर विजय’ साकारला. त्यानंतर 1980मध्ये ‘शान’ तर 1982मध्ये ‘शक्ति’ सिनेमात बिग बींनी ‘विजय कुमार’ नावाचं पात्र साकारलं होतं.
1980 च्या ‘दोस्ताना’ आणि 1975 च्या ‘दीवार’ सिनेमा बिग बींनी ‘विजय वर्मा’ मोठ्या पडद्यावर आला आणि तुफान हिट 1979 मध्ये आलेल्या ‘काला पत्थर’ सिनेमात अमिताभ बच्चन यांनी ‘विजय पाल सिंह’ अशी भूमिका केली होती. त्यानंतर 1991 मध्ये ‘अकेला’ सिनेमात पुन्हा बिग बींच्या पात्राचं नाव ‘इन्स्पेक्टर विजय वर्मा’ होतं. 2007 मध्ये आलेल्या ‘निशब्द’, 2010मधील ‘रण’ सिनेमाही बिग बींचं नाव ‘विजय हर्षवर्धन’ होतं.
1990 मध्ये आलेला अमिताभ बच्चन यांचा सर्वात ढासू सिनेमा अग्निपथमध्ये देखील त्यांनी विजय हे पात्र साकारलं होतं. विजय दिनानाथ चौहान. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.
1988 मध्ये आलेल्या शेहंशाह सिनेमानं बिग बींना बॉलिवूडचे शेहंशाह बनवलं. या सिनेमातही त्यांचं नाव विजय कुमार श्रीवास्तव होतं.
2001मध्ये आलेल्या ‘एक रिश्ता: द बॉंड ऑफ लव’ सिनेमा विजय कपूर, 2002 मध्ये आलेल्या ‘आंखे’ सिनेमा विजय सिंह राजपूत तर 2006 मध्ये आलेल्या ‘गंगा’ सिनेमात ठाकुर विजय सिंह नावाच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. इतकंच काय तर 2007 मधील ‘निशब्द’ 2010 मधील ‘रण’ सिनेमातही बिग बींचं नाव विजय हर्षवर्धन मलिक असं होतं.
अमिताभ बच्चनचं नाव सगळ्या सिनेमात विजय का असतं याच कारण जावेद अख्तर यांनी सांगितलं होतं. ते म्हणाले होते, अमिताभ सगळ्या बाबतीत विजय मिळवतात त्यामुळे सर्वाधिक सिनेमात त्यांचं नाव विजय ठेवण्यात आलं.






