Amalner

Amalner: पाणी पुरी खायला गेलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी लांबविले..!

Amalner: पाणी पुरी खायला गेलेल्या महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी लांबविले..!

अमळनेर शहरातील महिलेच्या गळ्यातून दोन अज्ञात इसमानी ९ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबवल्याची घटना २८ रोजी सायंकाळी लोकसेवा झेरॉक्स जवळ घडली.

याबद्दल सविस्तर माहिती अशी की, अमळनेर शहरातील पटवारी कॉलनीतील रहिवासी वंदना गणेश पाटील या सायंकाळी घरा शेजारील महिलेसोबत पाणी पुरी खायला जात असताना महाराणा प्रताप चौकाजवळ विरुद्ध दिशेने मोटरसायकलवर पांढऱ्या कपड्यातील दोन जण येऊन गळ्यातील पोत हिसकावून पळुन गेले. घटना घडताच डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ यांनी भेट दिली. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button