Amalner: आयशर ची दुचाकीला धडक एक ठार दुसरा जखमी..!
अमळनेर ओव्हरटेक करून ब्रेक मारल्याने दुचाकी आयशर मालवाहू गाडीवर धडकून एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना दिनांक 27 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आश्रम शाळेजवळ घडली. याप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अरविंद रामदास माळी (वय 28 रा.काकरदे ता.नंदुरबार) व गणेश अहिरे यांच्या सोबत मोटरसायकल (क्र. एम एच 39 एजी
0964) ने धरणगाव येथे नातेवाईक यांच्या वर्ष श्राद्ध कार्यक्रमासाठी जात असतांना ताडेपुरा भागातील आदवासी आश्रम शाळेजवळ अज्ञात आयशर गाडीने ओव्हरटेक करून अचानक पुढे जाऊन ब्रेक मारल्याने मागून येणारी मोटरसायकल आयशर गाडीला धडकली. त्यात मोटरसायकल चालक अरवींद माळी याच्या डोक्याला मार लागल्याने जबर दुखापत झाली असताना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास मयत घोषित केले तर या अपघातात गणेश अहिरे जखमी झाला आहे. अविनाश जीभाऊ वाघ याने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात आयशर चालकाविरुद्ध भादवी कलम 304 (अ), 297,337,338 तसेच मोटार वाहन कायद्या च्या कलम 184,134 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहे.






