Amalner

Amalner: कर वसुली साठी गेलेल्या न प कर्मचाऱ्यांना धक्का बुक्की..! सरकारी कामात अडथळा..! पोलिसात गुन्हा दाखल…

Amalner: कर वसुली साठी गेलेल्या न प कर्मचाऱ्यांना धक्का बुक्की..! सरकारी कामात अडथळा..! पोलिसात गुन्हा दाखल…

अमळनेर (प्रतिनिधी) सध्या अमळनेर शहरात मार्च एडिंग मुळे वसुली सुरु आहे. याच पार्शवभूमीवर शहरातील पिंपळे रोड परिसरातील अल्हाद नगर भागात कर वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले. यासाठी वसुलीला गेलेल्या पथकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करणाऱ्या दोन जणांवर अमळनेर पोलिसांत शासकीय कामात अडथडा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, कर्मचारी प्रविण शेलकर, गणेश शिंगारे, महेंद्र बि-हाडे, वाहन चालक फारूक उस्मान आदी कर वसुली साठी पिंपळे रोड परिसरात असणाऱ्या अल्हाद नगर भागात गेले होते. 24 तारखेस संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सुनंदा सुभाष पवार यांच्या कडे कर वसुली साठी पथक गेले असता त्यांचा मोठा मुलगा देवेंद्र सुभाष पवार व लहान मुलगा धीरज पवार यांनी कर वसुलीसाठी आलेल्या पथकाला अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. व दमदाटी करून धक्काबुक्की करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात दोन जणांविरुद्ध भादवी कलम 353,294,54 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक
अनिल भुसारे करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button