Amalner

Amalner: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची प्रंलबित रक्कम अदा करण्या बाबत आम आदमी पक्षाचे निवेदन…

Amalner: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची प्रंलबित रक्कम अदा करण्या बाबत आम आदमी पक्षाचे निवेदन…

अमळनेर सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदातनीसांची प्रलंबित रक्कम अदा करावी म्हणून आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन लक्ष वेधले.
आम आदमी पार्टीअमळनेर व पारोळा यांचेसह जिल्हाभरातील कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. पारोळा येथील एन एस हायस्कूल पटांगणावर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत आम आदमी पार्टी अमळनेर, पारोळा व जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागातून अमळनेर सह जिल्ह्यातील सेवा निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना आयुक्त कार्यालया मार्फत मंजूर रक्कम अदा करण्यात आली नाही.
निवृत्त सेविकांना एक लाख तर मदतनीसला 75000/-अशी रक्कम अदा करण्यात येते परंतु शासना कडून आज पर्यंत संबंधीतांना रक्कम मिळालेली नाही त्यातून काही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे निधन झालेले आहे, तरी शासनाने संबंधितांना लवकरात लवकर रक्कमेचा लाभ अदा करण्यात यावा.अशी मागणी अमळनेर तालुक्याच्या वतीने आम आदमी पार्टीचे पदाधिकारी डॉ महेश पवार, अमळनेर तालुकाध्यक्ष संतोष पाटील, नारायण पितांबर पाटील, संजीव पंढरीनाथ पाटील, राकेश राजपूत तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी केली. पारोळा पोलीस निरीक्षक वाकोडे यांनी निवेदन स्वीकारले मुख्यमंत्रीना पोचते केले!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button