प्रा डॉ मनोज पाटील यांचा दुर्गभ्रमंती मंडळातर्फे सत्कार
उदय वायकोळे चांदवड
चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन संचलित आबड लोढा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विभागप्रमुख प्रा डॉ मनोज पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आदर्श प्राध्यापक पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.यानंतर चांदवड येथे आल्यावर चांदवड दुर्गभ्रमंती मंडळाच्या सदस्यांनी पाटील सरांची भेट घेऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला.पाटील सरांचे विज्ञान विषयातील जैवविविधता बाबत phd झालेली असून अनेक कॉन्फरन्स व पेपर त्यांनी प्रेझेन्ट केलेले आहेत.ते काही प्राध्यापकांचे गाईड सुद्धा आहेत.
यावेळी प्रा चांगदेव कुदनर, प्रकाश सूर्यवंशी, संतोष सोनवणे(पेशवे),स्वप्नील वाघ,प्रफुल्ल सोनवणे,रतन दिवटे,संजय पाडवी,जितेंद्र डाके,रुपेश पवार,उदय वायकोळे, पिंटू राऊत आदी उपस्थित होते






