Amalner: ममता विद्यालयातील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धेसाठी निवड..
अमळनेर ममता शाळेतील विद्यार्थिनी राज्यस्तरीय दिव्यांग मुला मुलींच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जळगांव येथे जिल्हास्तरीय दिव्याग मुलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यात ममता विद्यालयातील पल्लवी सुरेश पाटील १०० मी. धावणे व गोळाफेक मध्ये प्रथम क्रमाक आली. जागृती प्रविण गव्हाणे लांब उडी प्रथम आली त्यामूळे त्यांची पुणे येथे दि.१४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय निवड झाली आहे.
त्यांना मुख्याध्यापक विनोद पाटील, कल्पना ठाकूर, वैशाली राऊळ, राजेंद्र मनोरे, वासुदेव कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. मंगेश वैद्य, वैशाली वैद्य, डॉ. मिलिंद वैद्य, गिरीश कुलकर्णी व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.






