Amalner: जिल्हा परिषद उच्च माध्य.शाळेला वडिलांच्या स्मरणार्थ संदीप पाटील यांच्या कडून पाण्याचे फिल्टर भेट..!
अमळनेर तालुक्यातील निंभोरे येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मराठी शाळेत अरूण (नाना) रामभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ सदिप अरुण पाटील यांच्याकडून तासी ५० लिटर शुद्ध आरओ पाण्याचे फिल्टर भेट म्हणून देण्यात
आले. फिल्टर पाण्याचे उदघाटन मंगलाबाई अरूण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किशोर संतोष पाटील होते. कार्यक्रमाला निंभोरेच्या सरपंच पायल सुनिल पाटील, प्रा. सुनिल पाटील, ग्रा.पं. सदस्या कौमुदी
विनोद पाटील, विनोद पाटील, शाळा कमेटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर प्रकाश पाटील, जगदीश चिमणराव पाटील, रंगराव पाटील, शरद पाटील,शाळेचे मुख्याध्यापक व स्टाफ व गावातील नागरिक उपस्थित होते.






