Mollywood: 22 बाईक चोर चक्क मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता..!
आजवर आपण अनेक चोरीच्या घटना पहिल्या आहेत. परंतु नुकत्याच समोर आलेल्या चोरीच्या घटनेने मराठी सिनेसृष्टीला धक्काच बसला आहे. कारण हा चोर दुसरा तिसरा कोणी नसून मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
त्याने आजवर तब्बल एक-दोन नव्हे तर २२ बाईक चोरी केल्याचं समोर आलं आहे. या घटनेने सिनेसृष्टीत खळबळ निर्माण झाली आहे. हा सिरीयल चोर दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता सुनील चौधरी आहे. सुनीलने आता पर्यंत अनके मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची तसेच लहान सहान भूमिका साकारल्या आहेत.
आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने अनेक प्रेक्षकांना आपलेसे देखील केले होते. परंतु कोविड काळात अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. या काळात चित्रपट आणि मालिकांचं चित्रीकरण मोठ्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आलं होतं.
याचाच फटका अभिनेता सुनीलला देखील बसला. यानंतर त्याला आर्थिक चणचण भासू लागली आर्थिक अडचण दूर करण्यासाठी त्याने मुंबई सोबतच आजूबाजूला परिसरातील बाईक चोरण्यास सुरवात केली. तो बाईक चोरून जळगाव या भागात १० ते १५ हजारांना ती विकायचा.
हि घटना उघडीस येण्या पूर्वी सुनीलने मुलुंडमधील गव्हाणपाडा परिसरात राहणाऱ्या अरविंद उकर्डे यांची बाईक चोरीली होती. सदर प्रकरणांवर नवघर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तपासा दरम्यान एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले.
या सीसीटीव्ही फुटेजच्या चाचपणी नंतर हि मोठी घटना समोर आली अखेर पोलिसांनी अभिनेता सुनील चौधरी याला अटक केले असून त्याला ताब्यात घेतले आहे. सुनीलने आजवर २२ बाईक चोरल्याची देखील कबुली दिली आहे.






