Amalner

Amalner: महिलांच्या हस्ते १०० सीसीटीव्ही कॅमे-यांचे उद्घाटन

महिलांच्या हस्ते १०० सीसीटीव्ही कॅमेºयांचे उद्घाटन

अमळनेर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या संकल्पनेला सर्व स्तरावरुन उदंड प्रतिसाद मिळत असून ढेकुरोडवरील धनदाई महाविद्यालयसह भोवतालचा कॉलनी परिसरही उच्चदर्जाच्या सीसीटीव्ही कॅमे-यांच्या निगराणीत आला आहे. नुकताच धनदाई महाविद्यालयात १०० कॅमे-यांचा लोकार्पण सोहळा शुभांगी राकेश जाधव, प्रा. नयना कैलास पाटील, प्रा. वैशाली मोरे, शिक्षिका रेखा नंदकुमार पाटील व मुख्याध्यापिका निवेदिता पाटील यांच्याहस्ते पार पडला.

राकेश जाधव यांच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत धनदाई एज्यु. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डी.डी.पाटील, उपाध्यक्ष के.डी.पाटील, संचालक नंदकुमार दयाराम पाटील यांनी स्वखर्चाने संपूर्ण महाविद्यालय परिसर व कॉलनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले.

शहर व तालुका डीवायएसपी राकेश जाधव यांच्या संकल्पनेनुसार टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमे-यांच्या निगराणीखाली येत असून जवळपास ९० टक्के शहर गुन्हेगारीपासून सुरक्षित झाल्याचे निदर्शनास येत आहे.

कॉलेज म्हटले म्हणजे त्याठिकाणी विद्यार्थीनींची छेडखानी, गुडटच-बॅडटच, विनयभंग आदी नको ते प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता विद्यार्थींनीच्या बाबतीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असले कुठलेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून डीवायएसपी राकेश जाधव यांनी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाशी चर्चा करुन लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेºयांची संकल्पना मांडली.

या संकल्पनेचा डी.डी.पाटील, के.डी.पाटील यांनी उदंड प्रतिसाद देत स्वखर्चाने संपूर्ण कॉलेज परिसर त्यातच प्रत्येक वर्गात उच्चदर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. त्यात ते स्वत: राहत असलेल्या कॉलन्या जसे की, आशिर्वाद नगरात के.डी. पाटील यांनी, गायत्री नगरात डी.डी. पाटील व राजू फापोरेकर, जय योगेश्वर कॉलनीत नंदकुमार पाटील यांनी स्वखर्चाने कॅमेरे बसवून संपूर्ण कॉलनी परिसरही सुरक्षित करुन घेतला. विशेष म्हणजे कॉलेजमध्ये बसविलेल्या कॅमेºयांमुळे भगवती नगरदेखील सुरक्षित झाले आहे.

यावेळी प्राचार्य डॉ. प्रमोद पवार यांनीही मनोगतातून या संकल्पनेचे कौतुक करत राकेश जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले. सूत्रसंचालन के.डी.पाटील यांनी करुन आभारही मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी प्रयत्न केले.

शहरातील गुन्हेगारी कमी होण्यासाठी पोलीस खात्यात मनुष्यबळाचा विचार करता लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेºयांची संकल्पना अमलात आणली. त्यास शहरातील जनतेचे उदंड प्रतिसाद दिल्याने सुमारे ७० टक्के शहर कॅमेºयांच्या निगराणीखाली आले आहे. या कार्याचे श्रेय मी फक्त जनतेलाच देतो, कारण जनतेने लोकसहभाग वाढविला नसता तर ही संकल्पना केवळ कागदावरच राहिली असती, मात्र लोकांनी या संकल्पनेला योग्य तो प्रतिसाद दिला आणि त्यामुळे सर्वत्र कॅमे-यांचे जाळे विणले गेले. त्यामुळे या सर्व कार्याचे श्रेय मी फक्त जनतेलाच देतो.
-राकेश जाधव, डीवायएसपी, अमळनेर

आपल्या अमळनेर तालुक्याला राकेश जाधव साहेबांसारखे डीवायएसपी लाभणे हे आपले भाग्यच आहे. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात जे सीसीटीव्ही कॅमेºयांचे काम झाले आहे, ते एक ऐतिहासिक आहे. कारण गेल्या दोन वर्षात शहरातील गुन्हेगारी जवळपास नाहीच्या बरोबर आहे. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थीनी सुरक्षित राहाव्यात या उदात्त हेतूने साहेबांच्या संकल्पनेला आम्ही प्रतिसाद देत संपूर्ण कॉलेज कॅँपसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले. शिवाय आमचा कॉलनी परिसरही सुरक्षित करुन घेतला. साहेबांची काम करण्याची पद्धत खरंच खूप वेगळी आहे, त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे काम शक्य झाले आहे.
-डी.डी. पाटील, संस्थापक अध्यक्ष, धनदाई एज्यु. सोसायटी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button