Amalner: प्रभाग क्र.17 मधील अमलेश्वर महादेव मंदिर परिसरात केली साफसफाई…
अमळनेर येथील बहादरपूर नाक्या जवळील असलेल्या जागृतदेवस्थान असलेले अमलेश्वर महादेव मंदिर स्थानिक नागरिकांच्या मुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्या मुळे लोकांना जाण्यासाठी अडचण येत होती. हे न.पा चे मा.उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे उर्फ बिजू नाना यांनी स्थानिक लोकांची तक्रार ऐकून त्वरित न. पा.चे कर्मचारी घेऊन संपुर्ण परिसर स्वच्छ करून घेतला. जागृत देवस्थान असलेले अमलेश्वर महादेव मंदिर आज भाविकांनी दुमदुमू लागला आहे. संपुर्ण मंदिर परिसर नव्याने सुशोभीकरण केले जात आहे. त्या साठी स्थानिक नागरिकांचं सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. मंदिर परिसरात केरकचरा होणार नाही याची काळजी घ्यावी तरी सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले आहे.






