Amalner

Amalner: वडिलांच्या स्मरणार्थ तिन्ही मुलांनी श्मंगळग्रह मंदिराला दिले बाक भेट

Amalner: वडिलांच्या स्मरणार्थ तिन्ही मुलांनी श्मंगळग्रह मंदिराला दिले बाक भेट

अमळनेर :

येथील मंगळग्रह मंदिराला तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक वंजी श्रावण वाणी यांच्या पुण्यस्मरणार्थ तिन्ही मुलांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी तीन बाक भेट दिले.
मुख्याध्यापक वंजी वाणी (वाणी गुरुजी) यांचे २०२० मध्ये निधन झाले. वाणी गुरुजी यांचा शिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास जिल्हा परिषदेच्या शाळेत झाला. त्यांनी घडवलेले विद्यार्थी आज उच्च पदापर्यत पोहोचले आहेत. वडिलांच्या आठवणीला उजाळा देत विजय, संजय व मुलगी सुनंदा वाणी या तिघा भावंडांनी अनावश्यक खर्च टाळून वडिलांच्या आठवणी चिरंतर राहावे, यासाठी मंगळ ग्रह मंदिरात येणाऱ्या भाविकांना बसण्यासाठी बाक उपलब्ध करून दिले आहे. मंगळ ग्रह संस्थेचे खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत सोपविण्यात आले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button