Amalner: वसुली साठी गेलेल्या न प कर्मचाऱ्यास नागरिकांनी केली मारहाण..!पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!
अमळनेर नगरपालिकेची कर वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला दोघांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अमळनेर नगर परिषदेची घरपट्टी पाणीपट्टी वसुलीची धडक मोहीम सुरू असून आहे. या मोहिमेअंतर्गत वसुली कर्मचारी शंकर छाबडीया मंगल नगर ताडेपुरा भागात वसुली कामी गेले असता त्या भागातील सोनू रमेश पाटील व अजून एक व्यक्ती (नाव माहित नाही) यांनी छाबडिया यास आमच्याकडे वसुलीसाठी का येतो असं म्हणून चापटी ,बुक्के व लाथेने मारहाण केली. छाबडिया यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात कलम ३२३,५०४,५०६ या प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा कर्मचारी संघटनेने विरोध केला असून वसुलीच्या कामात अथवा कर्मचाऱ्यांना जर अश्या शासकीय कामात जर यापुढे कोणी अडथळा अथवा हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांना कोणी त्रास देण्याचे काम करीत असतील तर अमळनेर
नगरपरिषदेतील सर्व कर्मचारी संघटना सनदशीर मार्गाने आंदोलन करतील, असे भारतीय कर्मचारी महासंघाचे सोमचंद संदानशिव व प्रसाद शर्मा यांनी निषेध व्यक्त करून सांगितले.






