Amalner

Amalner: इंटर स्कुल इलोकेशन स्पर्धेत शौर्य पाटील प्रथम तर रिया मनोरे ने पटकावला द्वितीय क्रमांक..!

Amalner: इंटर स्कुल इलोकेशन स्पर्धेत शौर्य पाटील प्रथम तर रिया मनोरे ने पटकावला द्वितीय क्रमांक..!

अमळनेर (अमळनेर) न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रीय युवक दिनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या इंटर स्कुल कॉम्पिटीशनमध्ये सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल मंगरूळ येथील इ ७ वी चा विद्यार्थी कुमार शौर्य जितेंद्र पाटील हा
प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरला.तर द्वितीय स्थानी रिया उमेश मनोरे हिने पटकावला आहे.

यामध्ये चॅम्प ग्रुप मध्ये ( ई. ५ वी ते ७ वी) या गटात एकूण ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात शौर्य पाटील प्रथम आला. तो शहरातील होमिओपॅथी कन्सल्टंट (श्री सेवा क्लिनिक) डॉ. जितेंद्र पाटील व डॉ. स्नेहल पाटील यांचा मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच द्वितीय क्रमांक ग्लोबल स्कुल ची विद्यार्थिनी रिया उमेश मनोरे ही उमेश मनोरे प्राथ शिक्षक यांची कन्या रा प्रताप मिल कंपाउंड हिने पटकावला तर तृतीय क्रमांक न्यू व्हिजन स्कुलची विद्यार्थीनी निधी भावेश पवार, चतुर्थ क्रमांक कु. भक्ती मकवणा व आर्या संदेश पाटील यांनी पटकाविला. परीक्षक म्हणून प्राध्यापक लीलाधर पाटील, तसेच इंजिनियर हर्षल बोरसे यांनी काम पाहिले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button