Nashik

जालखेड तालुका दिंडोरी येथे उपसरपंच पदी सोनाली मोरे यांची निवड

जालखेड तालुका दिंडोरी येथे उपसरपंच पदी सोनाली मोरे यांची निवड

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील
जालखेड ग्रामपंचायत उपसरपंच पद निवडणुकीचा कार्यक्रम लोकनियुक्त बिनविरोध सरपंच सन्माननीय ताईबाईजी मोतीराम झनकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सदर निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच यांनी उपसरपंच पदी सन्माननीय सोनालीजी रघुनाथ (नानभाऊ) मोरे यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली…
सदर कार्यक्रमाची सुरुवात ही राष्ट्रीय महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य धरतीआबा बिरसा मुंडा, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.
नवनिर्वाचित सन्माननीय लोकनियुक्त सरपंच यांचा सत्कार माजी सरपंच सुरेशजी चारोस्कर यांनी केला, तसेच सन्माननीय उपसरपंच यांचा सत्कार माजी सरपंच साहेबरावजी झनकर सर यांनी केला…
जेष्ठ तसेच अनुभवी सदस्य अक्काबाई झनकर यांचा सत्कार अशोक मोरे यांनी केला..
सर्वच नवनिर्वाचित बिनविरोध सदस्य माजी उपसरपंच तथा विद्यमान बिनविरोध सदस्य जीवनदादा मोरे, एकनाथअप्पा मोरे, मनिषाजी गांगोडे, संगीताजी मोरे, रत्नाजी झनकर, कृष्णाजी डगळे, तानाजी झनकर यांचा सत्कार गावच्या सन्माननीय नागरिकांनी केला…
सदर निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून पाटील सर उपस्थित होते, ग्रामसेवक गायकवाड सर, पोलीस कर्मचारी सह उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button