चांदवडला चंद्रेश्वरबाबा संयुक्त पुण्यतिथी उत्साहात साजरी
चांदवड उदय वायकोळे
आज दि 9 जानेवारी 2023 रोजी श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड चांदवड येथे प्रथम चंद्रेश्वरबाबा स्वामी दयानंदजी व द्वितीय चंद्रेश्वरबाबा महामंडलेश्वर विद्यानंदपुरीजी महाराज यांची संयुक्त पुण्यतिथी सोहळा सालाबादप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भक्तपरिवाराचा आलोट जनसागर उसळला होता.
श्री चंद्रेश्वरबाबा पुण्यतिथी च्या पूर्वसंधेला रात्री ह.भ.प. नारायण महाराज पंढरपूरकर यांचे सुश्राव्य किर्तन झाले. सोमवारी सकाळी चंद्रेश्वर महादेव अभिषेक व चंद्रेश्वरबाबा समाधी पूजन , सप्तऋषी समाधी पुजन , होऊन पालखी सोहळ्यात असंख्य भाविक भक्तांसह नाथशक्ती गृप , पेठ येथील भक्त व श्री चंद्रेश्वर भक्त परिवाराचे सदस्य मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. पालखी सोहळ्यानंतर भंडारा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी महंत श्री बन्सीपुरीजी महाराज ( तृतीय चंद्रेश्वरबाबा ), महंत श्री लक्ष्मीनारायणपूरीजी , महंत श्री जगन्नाथपुरीजी , दिगंबर स्वामी श्री शिवानंदपुरीजी , स्वामी महेशपुरीजी ( काशी ), स्वामी जयदेवपुरीजी ( चंद्रेश्वरगडाचे व्यवस्थापक ) स्वामी अजयपुरीजी ( त्र्यंबकेश्वर आखाडा ) स्वामी डॉ नागराजपुरीजी ( नाशिक ) , स्वामी गणेशपुरीजी ( देवदारे ) स्वामी रामचंद्रपुरीजी ( नागापूर ) आदी संत-महंत व पंचक्रोशीतील भजनी मंडळ व चंद्रेश्वर भक्त परिवारातील असंख्य भाविक – भक्त सोहळ्यात सहभागी झाले.






