फैजपुरात दिव्यांग सेने सह विविध ठिकाणी पत्रकारांचा सन्मान
फैजपुर सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपुर तालुका
फैजपूर येथे दिव्यांग सेनेसह विविध ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला 6 जानेवारी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारितेचे पिता मह आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांचा दिव्यांग सेनेसह शहरात ठिकठिकाणी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पूजन ज्येष्ठ पत्रकार अरुण होले यांनी केले यावेळी दिव्यांग सेनेचे पदाधिकारी यांनी शहरातील पत्रकारांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला यावेळी पत्रकार प्राध्यापक उमाकांत पाटील सर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की खरोखरच ज्या लोकांना प्रसिद्धी हवी असते त्या लोकांनी पत्रकार यांचा सत्कार सन्मान करायच असायला पाहिजे परंतु हे लोक केवळ पत्रकारांचा वापर प्रसिद्धी साठी करीत असतात याबाबत मात्र पत्रकारांनी खेद व्यक्त केला आणि शहरातील दिव्यांग सेनेचे कार्यकर्ते आणि विविध ठिकाणी जो सत्कार करण्यात आला त्या लोकांना प्रसिद्धीची कोणतीही गरज नसताना सुद्धा त्यांनी यावेळी शहरातील सर्व पत्रकारांचा सन्मान केला याबाबत पत्रकारांनी समाधान व्यक्त केले मात्र जे लोक पत्रकारांना केवळ प्रसिद्धीसाठी वापर करतात अशा लोकांबाबत शहरातील पत्रकार पुढील लवकरच दिशा ठरवणार असल्याचे यावेळी सांगितले शहरातील दिव्यांग सेनेसह फैजपूर पोलीस स्टेशन तर्फे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांनी सुद्धा पत्रकारांचा सन्मान केला तसेच महारुख हॉस्पिटल चे डॉक्टर मुदतसर नजर यांनी पत्रकारांचा सन्मान केला यावेळी दिव्यांग सेनेचे पदाधिकारी नितीन महाजन नाना मोची योगेश चौधरी मुन्ना संजय वायकोळे चेतन तळेले गणेश भारंबे कुणाल वायकोळे रोहित भारंबे रोशन तायडे मोहम्मद वसीम यांच्यासह गणेश गुरव सर अनिरुद्ध सरोदे हे उपस्थित होते पत्रकार अरुण होले वासुदेव सरोदे प्राध्यापक उमाकांत पाटील राजेंद्र तायडे सलीम पिंजारी फारुख शेख निलेश पाटील योगेश सोनवणे राजू तडवी समीर तडवी शाकीर मलिक संजय सराफ हे उपस्थित होते






