अवैध गोवंशाचे पत्री शेड हटवा:मुस्लिम बांधवांची मागणी!
“तसेच या अर्जद्वारे सदरील गंभीर बाब आपल्या निदर्शनास आणून सुद्धा दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित यंत्रणा व गोवंशचा व्यवसाय करणारेच जबाबदार राहील.असा इशारा निवेदन कर्त्यांनी दिले आहे.”
—————————————-
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा येथे वाहनात अवैध गोवंश असल्याचे संशय वरून जवळपास एका महिन्यांपूर्वी गोतस्कर व गोरक्षकांमध्ये उडालेले धुमचक्र व त्यामुळे शहरात निर्माण झालेला तनावपुर्ण वातावरणा सारखी पुनरावृत्ती भविष्यात शहरावर येवू नये.तसेच या अवैध गोवंशच्या व्यवसायाशी मुस्लिम समाजाचा अजिबात काहीही एक संबंध नाही.मात्र सदरचा व्यवसाय करणारे जर कुरैशी समाजातील फक्त आणि फक्त दोन-चार लोकांमुळे की काय?अकारण संपूर्ण मुस्लिम समाजाला वेठीस धरले जाणे योग्य नाही.सबब हा अरसा दाखवण्याकामी सदरील घलेली घटनेच्या निषेधार्थ सामाजिक दृष्टीकोनातून दि.१ डिसेंबर २०२२ रोजी समाजातील मुस्लिम बांधवांनी जाहीर निषेधाचे निवेदन यंत्रणेकडे दिलेले असून,पंरतु पुनच्छ गो तस्करांनी डोके वर काढू नये. म्हणून गौसियानगर भागात कुरैशी समाजातील ज्या ठराविक व्यक्तींनी अवैध गोवंश उतरण्यासाठी तथा लपवण्यासाठी थेट बेकायदेशीरपणे मोठ मोठे दोन पत्र्यांचे गोडावून उभारलेले असून त्या गोडावूनचे वापर वाहनांद्वारे अवैध गोवंश उतरवत असून यामुळे पुन्हा भविष्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार यामुळे घडू नये(तसेच शहराची कायदा व सुव्यवस्थेला बांधा निर्माण होवू नये)तसेच लंपी या आजाराच्या अनुषंगाने गुरांची वाहतूकीस जिल्हाधिकारी द्वारे बंदीचे आदेशाचे थेट उल्लंघन करून सदर प्रकारे अवैध गोवंशचा व्यवसाय सावदा शहरात सर्रास होत असून,या तस्करांना जोकोणी परद्या माघून पाट बळ देत असेल त्या व्यक्तीचा प्रशासनाने बंदोबस्त करून सदरील बेकायदेशीर पत्र्यांचे गोडावून जमीनदोस्त करावे.अशी मागणी निवेदनाद्वारे एपीआय जालिंदर पळे पो.स्टे सावदा , मुख्याधिकारी न.पा.सावदा कडे ५० ते ६० मुस्लिम बांधवांनी मगणी केली असून निवेदनाच्या प्रति प्रांत अधिकारी फैजपूर व जिल्हा पोलिस अधीक्षक जळगांव यांना सुद्धा पाठवले जाईल.






