Amalner: लोकसहभागातून शास्त्रीनगर आणि सद्गुरू नगर येथे डीवायएसपी राकेश जाधव यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा लोकार्पण सोहळा संपन्न
अमळनेर दि. 0५ : संपूर्ण शहर गुन्हेगारीमुक्त व्हावे, या उद्देशाने पछाडलेले तालुक्याला लाभलेले डीवायएसपी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाने सद्गुरु नगर व शास्त्रीनगरात सीसीटीव्ही कॅमे-यांचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
ढेकूरोडवरील सद्गुरु नगर येथे डीवायएसपी राकेश जाधव, शास्त्री नगर येथे भगिरथ टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक भगिरथ पाटील यांच्याहस्ते ४ रोजी सीसीटीव्ही कॅमेºयांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जय योगेश्वर माध्य. व उच्चमाध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य के.डी.पाटील, एम.एन.पाटील, मोतिलाल महाजन, हेकॉ. संजय लोटू पाटील, पोना. संजय रमेश बोरसे, शिवरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूराव ठाकरे, दीपक काटे तसेच कॉलनीतील लोकसहभागास प्राधान्य देणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राकेश जाधव यांनी प्रथमत:च नागरिकांच्या आग्रहास्तव सद्गुरु नगरात कॅमे-यांचे उद्घाटन केले हे विशेष. आतापर्यंत त्यांनी त्या-त्या कॉलनीतील नागरिकांच्याच हस्ते उद्घाटन करुन घेतले आहे.
रोजनिशी शहरात घडणा-या घटनांचे प्रमाण पाहता डीवायएसपी राकेश जाधव यांनी दोन वर्षांपूर्वीच लोकसहभागातून अद्ययावत सीसीटीव्ही कॅमे-यांची संकल्पना अमलात आणली. टप्प्याटप्प्याने पुढे जात ही संकल्पना आता १०० टक्के पुर्णत्वाकडे वाटचाल करताना दिसत आहेत. सुरुवातीला शहराचा बाहेरील भाग अर्थात मुख्य रस्ते सीसीटीव्ही कॅमे-यांनी आच्छादित करुन गुन्हेगारिला पायबंद घातला त्यानंतर कॉलनी परिसरात होणा-या घटना लक्षात घेता कॉलनीत प्रत्यक्ष भेट देत हजारो कॉर्नर सभा घेत नागरिकांना कॅमे-यांचे फायदे समजवत लोकसहभागास प्रेरित केले.
याचेच फलित आज शहरात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कॅमे-यांचे जाळे उभारणे शक्य झाले आहे. त्यामुळे सुमारे ९० टक्के शहर आज गुन्हेगारी मुक्त झाले आहे.
सद्गुरु नगरात यांचा लाभला लोकसहभाग- प्रविण पाटील, डी ई पाटील, ए जी पाटील, आर एल पाटील, जाधव सर, जोगी भाऊसाहेब, प्रल्हाद पवार, वानखेडे साहेब, भगवान बडगुजर, प्रेम सोनवणे, अमोल बोरसे, संजय मोरे, राजू मोरे, बी एस पाटील, दिवाणजी पाटील, देशपांडे साहेब, भटू पाटील, महाजन सर, मनोहर शिवदास शिसोद, वसंत राजधर पाटील महेश साहेबराव पाटील, राजेंद्र आत्माराम सोनवणे, राजाजी विंचुरकर, योगेश दिलीप पाटील, सुभाष नवल पाटील, बबनराव पुंडलिक पाटील, डॉ.के .बी. पाटील, गजमल भिवसन पाटील, योगेश्वर भाऊराव पाटील, विजय धर्मा पाटील, सागर विनोद महाले, जगदीश मदन चौधरी, राजेंद्र रामदास लोहारे इ.






