नाशिक येथे भुजबळ फार्म परिसरात बंदोबस्तात वाढ
भुजबळांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पोलीसांकडून खबरदारी
नाशिक शांताराम दुनबळे.
नाशिक – महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक शाळांमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांऐवजी सरस्वती देवीचे फोटो लावण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत वाद ओढवून घेतलेल्या माजी पालकमंत्री छगन भुजबळ याच्यावर टीकेचा भडीमार सुरू आहे. ही बाब लक्षात घेऊन भुजबळ यांच्या नवीन नाशिकमधील भुजबळ फार्म या निवासस्थानी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
मुंबई येथे एका कार्यक्रमादरम्यान माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये थोर महापुरुषांच्या फोटोऐवजी सरस्वती देवीचे फोटो लावण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत वादग्रस्त विधान केले. या वादग्रस्त विधानासंदर्भात राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटून भुजबळ यांचा निषेध केला जात आहे. या परिस्थितीमुळे भुजबळ फार्म येथे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात येऊन पेट्रोलिंगही वाढवण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगिरथ देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, भुजबळ यांनी केलेले वादग्रस्त विधान म्हणजे तमाम हिंदू देवतांचा अपमान तर आहेच पण असे वादग्रस्त विधान करून हिंदूच्या भावना या वक्तव्याने दुखावल्या गेल्या आहेत. माजी मंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी तमाम हिंदूंची जाहीर माफी मागावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भाजप ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली आहे.






