India

Amazing: तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर सॅटेलाईट दिसतात..? घाबरु नका..ही गुगलची नवीन ट्रिक..पहा व्हिडीओ…

Amazing: तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर सॅटेलाईट दिसतात..? घाबरु नका..ही गुगलची नवीन ट्रिक..पहा व्हिडीओ…

गुगल हे सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे. गुगल कंपनी अनेक भन्नाट इस्टर एग्स किंवा गुप्त संज्ञा शोधत असते. ज्याचा मजेशीर प्रभाव तुम्हाला सर्च करताना दिसून येतो. युएस स्पेस एजन्सी असलेल्या NASA च्या DART मोहिमेच्या यशानंतर गुगलने खास प्लॅन आखला आहे. मोहिमेच्या यशाच्या पार्श्वभूमीवर एका प्रभावी इस्टर एग्स गुगलने तयार केला आहे. Google ही सिक्रेट ट्रिक तुम्ही देखील ट्राय करू शकता.

नासाची ही DART मोहिमेची रचना उल्कापिंडापासून पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आखण्यात आली आहे. 27 स्प्टेंबर रोजी पहाटेच्या 5 वाजता अंतराळयान एका उल्कापिंडाला धडकला. त्याची पहिली चाचणी यशस्वी झाल्याने नासाने अभिमान व्यक्त केला. नासाने तयार केलेली ही डिफेन्स सिस्टिम मनुष्यजातीसाठी मदतगार ठरण्याची शक्यता आहे. याच नासाच्या यशाचं गुगलने वेगळ्या प्रकारे कौतुक केलंय.

Google वर ‘हा’ शब्द Search करा-

गुगलवर एखादा शब्द केला की आपल्याला पाहिजे ती माहिती मिळते. मात्र, गुगलच्या स्पेशल फिचर्समुळे तुमच्या कॉम्प्यूटरला काय झालं?, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. गुगलवर ‘NASA DART’ हा शब्द सर्च केल्यास तुम्हाला तुमच्या कॉम्प्यूटरवर एक सॅटेलाईट पहायला मिळेल. जो तुमच्या डाव्या बाजूवरून येईल आणि काही वेळातच तुमच्या कॉम्प्यूटरच्या उजव्या बाजूला धडकेल. त्यावेळी तुमच्या कॉम्प्यूटरची स्क्रीन थोडीशी डाव्या बाजूला झुकलेली देखील दिसते.

स्मॉल लेटर किंवा कॉपिटल लेटर या दोन्हीपैकी कोणत्याही एका लेटरचा वापर करून तुम्ही ही ट्रिक ट्राय करू शकता. गुगलच्या या भन्नाट कल्पनेला नासाने ट्विट करत दाद दिली. नासाच्या ट्विटरवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला.

तुमचा गुगल सर्च कदाचित काहीतरी आश्चर्यकारक वाटेल, तुम्हाला गुगलवर ‘NASA DART’ हा शब्द शोधायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ब्राउझरमध्ये तुमचे ग्रह संरक्षण करताना दिसतील, असं नासाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button