Amalner: अखेर मठगव्हाण सरपंच मायाबाई वाघ अपात्र..
अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण ग्राम पंचायतीच्या सरपंच माया प्रवीण वाघ व लबाड ग्रामसेवक प्रशांत भाईदास वाघ यांचे विरुद्ध ग्रामस्थ व काही सदस्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्या बद्दल तक्रार केली होती.
तत्कालीन गट विकास अधिकारी यांनी सत्यता असल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील सत्यता जाणून घेत सरपंच व ग्रामसेवक यांचे वर कारवाई बाबतचा अहवाल विभागीय आयुक्त नासिक यांना दिला होता.
या प्रकरणी अखेर न्याय प्रस्तापीत झाला असून भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाल्याने माया प्रवीण वाघ यांना अपात्र करण्यातचा निकाल आयुक्त यांनी दिला आहे. .
स्वच्छ भारत योजनेत आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी काही प्रामाणिक ग्रा प सदस्य व ग्रामस्थांनी दिलेल्या लढ्यास अखेर यश मिळाले आहे.
परंतु केवळ अपात्र करून चालणार नाही तर गुन्हा दाखल करून दंडात्मक शिक्षा सुनावली पाहिजे अशी मागणी
माया सोनवणे यांचा अपात्र ठरल्याचा आदेश येताच मठगव्हाण व पंचक्रोशीतून लोकहितवादीचे देखील अभिनंदन करण्यात आले.
या लढ्यात शेवटपर्यंत चिकाटीने पाठपुरावा करणारे प्रामाणिक सदस्य, नागरिक यांनी हा विषय लावून धरला त्यात यश आले आहे.







