Amalner: जानवे येथील मुख्य रस्त्याचे काँक्रीटी करण काम तातडीने सुरू करा..ग्रामस्थांची मागणी…
अमळनेर तालुक्यातील जानवे येथील क्रॉकीटी करणाचे बंद असलेले काम लवकर सुरू करून होणारे अपघात टाळण्याची ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जानवे येथील मुख्य रस्त्याचे गेल्या काही
महिन्यापासून काम सुरू होते. संबंधित काम हे संजय शिंदे यांच्या सोसायटीवर निविदा घेऊन मंजूर झालेले आहे.
जानवे येथे रोजगार हमी व 2515 ह्या योजनेतंर्गत मंजूर झालेले 40 लक्ष निधीचे काम चार महिण्यांपासून रखडले आहे .सबंधित काम हे संजय शिंदे यांच्या सोसायटी वर निविदा मंजूर झालेले आहे. सदरील ठेकेदाराने रस्ता कोरून डबर सोलिंग केली तेव्हा सुद्धा एक महिण्यापर्यत गावकरींना खडीवर वापरायला भाग पाडले व आता सुद्धा पि.सी.सी.करून ऐक महिना झाला व काम बंद केलेले आहे.सदरील कामाबाबत ठेकेदाराला व जि,प,बांधकाम विभाग अभियंता अमळनेर,खांबोरे रावसाहेब यांना भ्रमणध्वनी द्वारे विचारले असता ऊडवाऊडवीचे ऊत्तरे देत आहेत. तरी महाशयांना विनंती आहे कि आमची तक्रारीची दखल घेउन आम्हा गावकरींचे होणारे हाल पासून मुक्तता व्हावी…. सदरील रस्त्यावर अंधाऱ्यात चालतांना नागरिक पडतात तसेच जेष्ठ नागरिक व लहान बालकांना इजा होऊन दुखापत होत आहे. असे आशयाचे निवेदन जानवे येथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांना दिले आहे.






