मराठा विद्या प्रसारकचे नूतन संचालक मंडळ संस्था विकासास कटिबद्ध.. नितीन ठाकरे यांचें आश्र्वासन
नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्था ही महाराष्ट्र राज्यातील दोन नंबर असलेली सस्था नुकतीच आरोप प्रत्यारोप होऊन संस्थेच्या सर्व सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून प्रचंड मतांनी निवडून देऊन आमच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. तो विश्वास आम्ही सार्थ ठरवून मी व आमचे नूतन संचालक मंडळ संस्था विकासास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मविप्रचे नूतन सरचिटणीस नितीन भाऊ ठाकरे यांनी केले. खेरवाडी ग्रामपंचायत, सोसायटी व ज्ञानविकास मंडळाच्या वतीने येथील सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केलेल्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी प्रतिमा पूजन करण्यात येऊन व्यासपीठावरील अडव्हा. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, डी.बी.मोगल, एडवोकेट लक्ष्मण लांडगे, शिवा पाटील गडाख, रमेश पिंगळे, सयाजीराव गायकवाड, रमेशचंद्र बच्छाव, संदीप गुळवे, नंदलाल बनकर ,शोभाताई बोरस्ते, भागवत बाबा बोरस्ते आदींचा ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इको फ्रेंडली तथा पर्यावरण पूरक गणपती मुर्त्या बनविणारी कुमारी नुपूर विलास पाटील हिचा व सोसायटी सचिव गुरुळे तसेच नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप संगमनेरे यांचा प्रमुख अतिथी एडवोकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रसंगी खेरवाडी चे भूमिपुत्र व मविप्रचे नूतन संचालक एडवोकेट लक्ष्मण लांडगे यांनी संस्थेला शैक्षणिक विकासासाठी एक लाख रुपयाचा धनादेश सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी बाळासाहेब शिरसागर ऍडव्होकेट लक्ष्मण लांडगे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थी हेच दैवत या व्यक्तीला प्राधान्य देऊन मेडिकल कॉलेज व रुग्णालयात रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या व्यक्तीला प्राधान्य देऊ असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.जी.पाटील, यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र आहेर व आभार बबन लांडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच अश्विनीताई जाधव, उपसरपंच उमेश पगारे, पं.स.सभापती रत्नाताई संगमनेरे, सोसायटी चेअरमन दिलीप संगमनेरे, व्हाय चेअरमन संतोष उगले, ज्ञानविकास मंडळ अध्यक्ष सतीश मणियार ,सरचिटणीस रामकृष्ण लगड, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे पंचक्रोशीतील कर्मचारी वृंद, शिवांजली व शांतिगिरी पाणी वापर संस्था यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत व सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.






