Amalner

Amalner: महारक्तदान अभियानात लायन्स क्लब अमळनेरचा सक्रिय सहभाग..धनदाई महाविद्यालयात उभारणार रक्तदान केंद्र

Amalner: महारक्तदान अभियानात लायन्स क्लब अमळनेरचा सक्रिय सहभाग..धनदाई महाविद्यालयात उभारणार रक्तदान केंद्र

अमळनेर,प्रतिनिधी-
अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद,लायन्स क्लब अमळनेर आयोजित महारक्तदान शिबिराला शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महारक्तदान शिबिरात विविध संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने १००८ पिशवी रक्त संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लायन्स क्लब अमळनेर आयोजित या महारक्तदान शिबिराचे स्वतंत्र केंद्र धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयात उभारण्यात येणार आहे.या शिबिरासाठी लायन्स क्लब व लिओ क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळणार आहे.
१७ सप्टेंबर रोजी धनदाई महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या रक्तदान केंद्रावर सकाळी ८ ते ५ या वेळेत जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन धनदाई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी.डी.पाटील,महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन रावसाहेब के.डी पाटील तसेच लायन्स क्लब ,लिओ क्लब व धनदाई एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button