Faijpur

म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर येथील NCC विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर येथील NCC विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सलीम पिंजारी प्रतिनिधी फैजपूर तालुका यावल

– फैजपूर दिनांक 5/09/2022 रोजी कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ बांभोरी जळगाव येथे दिनांक 5/09/2022 ते 12/09/2022 एकूण सात दिवस NCC चे प्रशिक्षण बटालियन कडून JD/JW ,C.A.T.C कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यात आपल्या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून कल्चर प्रोग्राम मध्ये उत्कृष्ट काम केले विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल ,कॅप ,व प्रमाणपत्र मिळवून शाळेचे नाव लौकिक केले, म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर चे मुख्याध्यापक के टी तळले सर ,पर्यवेक्षक एस ओ सराफ सर ,सी एल धांडे सर, ए के महाजन सर,सांस्कृतिक प्रमुख बी डी महाले सर उपप्रमुख अनिता सिसोदे, आर एन तडवी,टी एम चौधरी, एन पी पाटील , ए एस नेहते,अर्शद पिंजारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच विजयी विद्यार्थी पल्लवी अनिल भावसार ,जागृती तायडे अक्षरा भारंबे ,स्वाती कापडे, श्रद्धा चौधरी, सायली गलवाडे, गायत्री गुरव,वैभव तायडे तसेच मार्गदर्शक NCC Officer अर्शद पिंजारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले ,व ग्रंथपाल विकास कापडे, खुशाल मेढे,त्यांचे सहकार्य लाभले शिक्षक वृंद कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button