Bollywood

Bollywood:ड्रामा क्वीन राखी सावंत लग्नासाठी बदलणार धर्म..!बॉयफ्रेंड आदिल म्हणाला मी मुस्लीम तर…!

Bollywood:ड्रामा क्वीन राखी सावंत लग्नासाठी बदलणार धर्म..!बॉयफ्रेंड आदिल म्हणाला मी मुस्लीम तर…!
अभिनेत्री राखी सावंत सध्या आदिल खान दुर्रानीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. आदिल हा बिझनेसमन आहे. नुकताच या दोघांचा एक म्युझिक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. राखी आणि आदिलचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि वेळोवेळी ते त्यांचं प्रेम व्यक्त करत असतात. राखी तर आदिलसाठी काहीही करायला तयार असते.

राखी आदिलबरोबर रिलेशनशिपमध्ये आल्यापासून तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल तर तुमच्या लक्षात येईल की ती आता पूर्वीसारखे बोल्ड आउटफिट्स कॅरी करत नाही. ती नॉर्मल ड्रेसमध्ये दिसते. राखी आदिलवरील प्रेमामुळे बोल्ड कपडे घालत नसल्याचं म्हटलं जातंय. राखी सावंतचं आदिलवर इतकं प्रेम आहे की त्याच्यासाठी ती बुरखा घालण्यास तयार आहे. इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राखीने स्वतः खुलासा केलाय की आदिल आणि त्याच्या कुटुंबाला राखीने ग्लॅमरस आणि शॉर्ट ड्रेस घातलेले आवडत नाही. त्यामुळे तिने नॉर्मल आणि सिंपल ड्रेस घालायला सुरुवात केली आहे.

रिपोर्टनुसार, राखी सावंतच्या मते, तिला आदिल आणि त्याच्या कुटुंबाला दुखवायचे नाही. त्यामुळेच ती नॉर्मल आणि सिंपल आउटफिट्स परिधान करतेय, यामुळे ती स्वतः खूप आनंदी असल्याचंही म्हणाली. तर, आदिलला याबाबत विचारलं असता तो म्हणाला, राखी शॉर्ट आणि विचित्र कपडे घालायची. म्हणूनच आपण तिला नॉर्मल आणि सिंपल कपडे घालण्यास सांगितलं आहे.

आदिल खान म्हणाला की,मी राखीला हिजाब किंवा बुरखा घालण्यास सांगितलं नाही. मी तिला धर्म बदलायलाही सांगितलं नाही, पण जर मी राखीबरोबर आहे, तर याचा अर्थ मी माझा धर्म विसरला पाहिजे असं नाही. माझी कौटुंबीक पार्श्वभूमी मुस्लिम आहे, त्यामुळे मी ते जपायला हवं. तसंच राखी लवकरच आपल्या कुटुंबाचा भाग होणार असल्याचंही आदिल म्हणाला, त्यामुळे ते दोघं नजीकच्या काळात लग्न करतील, अशी चर्चा सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button