सावद्यात यंदा विघ्नहर्ता “श्रीची”विसर्जन मिरवणूक उत्साह पूर्ण जल्लोषात
“तसेच शहरातील सुप्रसिद्ध उद्योगपती शब्बीर हुसैन हाजी अख्तर हुसैन उर्फ बाबू शेठ बोहरी यांनी चांदनी चौक परिसरातून जाणाऱ्या श्रींच्या विसर्जन मिरोणूकासाठी त्यांच्या राहत्या घराजवळ मोठे जनरेटर लावून अतिरिक्त लाईट लावले होते.व त्या ठिकाणी गेणेश भक्तांसाठी ठंड पिण्याचे पाणीची व्यवस्था देखील त्यांनी केलेली होती.आणि बंदोबस्ताला तैनाद पोलिसांनाही त्यांनी घरातून चहा कॉफी दिली.त्यांचे हे सर्वसमावेशक कार्य खरोखर कौतुकास्पद आहे.
—————————————-
*मस्जिदवर गुलाल फेकल्याची घटना*
“मात्र श्रीच्या विसर्जन मिरवणुकीत सरतेशेवटी रात्री काही उपद्रवी समाजकंटकांनी कायदा व सुव्यवस्था नष्ट व्हावी.म्हणून त्यांनी मोठा अखाडा मस्जितवर थेट गुलाल फेकल्याचे गैरकृत्य केल्यामुळे तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.तरी भविष्यात येणारे सन उत्सव समोर ठेवून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदर गैरकृत्य करणाऱ्यां विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल व्हावा.अशी मागणी एका तक्रारद्वारे सावदा पोलिस ठाण्यात बडा अखाडा मस्जिद ट्रस्ट कडून करण्यात आली असून तक्रारीच्या प्रति वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.”
—————————————-
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- रावेर तालुक्यातील सावदा येथे एकूण ३२ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरोणूका कोरोनाचे २ वर्ष वगळले तर यंदा शहरातील विविध देवी देवतांच्या रूपात श्रींच्या आकर्षण ठरत असलेल्या मुर्त्यांचे मिरवणूकीत सुंदर मनमोहक असे दर्शन घडत होते.यामुळे निर्माण झालेल्या चैतन्यदायी वातावरणात गणेश भक्तांच्या प्रत्येक मंडळाने नेत्रदीपक रोषणाई लावून वाजंत्रीच्य तालावर आज दि.९ सप्टेंबर रोजी कायद्याचा चौकटीत राहून गणेश भक्तांनी मिरवणूक पुढे सरकत सरकत मोठ्या जल्लोषपुर्ण वातावरणात आनंद घेत श्रींच्या विसर्जन मिरवणूका उत्साह पूर्वक साजरा केल्या आहे.सदरच्या प्रत्येक विसर्जन मिरवणूकीत तरूणाई सह भगिनी वर्गाचा अधीक प्रमाणात सहभाग विशेष लक्षणीय ठरला होता.तसेच सर्व काही चांगले सुरू असताना या दरम्यान सावदा न.पा.कडून ३ गणेश मंडळ ऐन मगरीबची नमाजच्या वेळी मार्ग नसताना थेट जामा मस्जिद समोरून वाजत-गाजत नेण्यात आले.यावेळी सदरची बाब तात्काळ पोलीसांच्या निदर्शनास आणून दिली.व यानंतर बडा अखाडा मस्जिदवर टाकण्यात आलेले गुलाल पोलीसांच्या उपस्थित अग्नीशमन वाहनद्वारे धोण्यात आले.तरी हे दोन ठिकाणच्या घटना वगळले.तर शहरात एपीआय देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी उ.पो.नि.समाधान गायकवाड,स.फौ.महेमूद शाह,पो.हे.का.उमेश पाटील,पो.का.तुषार मोरे,गो.वि.चे पो.यशवंत टाहकडे,देवेंद्र पाटील व सर्व पोलीस कर्मचारी आणि जळगांव पो.कमॉन्डो पथक, होमगार्ड पथक यांनी अतिशय चोख बंदोबस्त ठेवला होता.






