Amalner: 14 सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन….
अमळनेर प्रतिनिधी
शिक्षण विभाग पंचायत समिती अमळनेर व हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर यांच्या वतीने हिंदी दिवस व सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने तालुकास्तरीय निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
- इयत्ता पाचवी ते सातवी
निबंधाचा विषय- सबसे प्यारा देश हमारा
- इयत्ता आठवी ते दहावी
अमृत महोत्सवी भारत विविधता मे एकता..
वरील निबंध स्पुलकेज कागदावर 1000 ते 1500 शब्दांत लिहावा..
निबंध स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरात लिहावा,कागदाच्या मागच्या बाजूला लिहू नये,
शाळेने दोन्ही गटातील दोन चांगले निबंध व एकूण विद्यार्थ्यांंची यादी व शाळेचे कव्हरींग लेटरसह पाठवावे, सर्व सहभागी निबंधाला सहभागी प्रमाणपत्र देण्यात येईल, बक्षीस वितरणात ग्रामीण व शहरी भागातील चार स्पर्धकांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. निबंध 17 सप्टेंबर पर्यंत पोहच करावेत, निबंध स्पर्धा फी 10 रुपये आहेत,परीक्षकांनी तिन रूपये परीक्षा आयोजन व कागदासाठी खर्च करून उर्वरित रक्कम हिंदी अध्यापक मंडळाकडे पाठवावी व स्पर्धेसाठी विशेष सहकार्य युनियन बँक शहादाचे वरीष्ठ प्रबंधक मयुर पाटील यांचे सहकार्य लाभले आहे. तरी अमळनेर तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनीं स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कार्यकारणी सदस्य एन.आर.चौधरी, मनिष उघडे,माजी तालुकाध्यक्ष दिपक पवार तथा
हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर, सचिव दिलीप पाटील, सहसचिव कमलाकर संदानशिव,कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रसिध्दीप्रमुख ईश्वर महाजन तथा सदस्य यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.






