Nashik

बी के कावळे विद्यालय येथे शिक्षक दिन गुरू शिष्य सन्मान करून साजरा

बी के कावळे विद्यालय येथे शिक्षक दिन गुरू शिष्य सन्मान करून साजरा

सुनिल घुमरे नासिक प्रतिनिधी

भारतीय संस्कृतीने जगाला गुरु शिष्य परंपरेची मोठी देणगी दिलेली असून या परंपरेने गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या या विविध क्षेत्रात नावारूपास आणले आहे असे मत कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे अध्यक्ष शहाजी दादा सोमवंशी यांनी कादवा कारखाना येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले कादवा कारखाना कार्यस्थळावरील बी के कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर येथे कर्मवीर रास वाघ शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ यांच्या हस्ते ज्ञान संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन कर्मवीर रास वाघ व कै बाबुराव कावळे यांच्या प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलनाने झाली उपस्थित सर्व संचालक मंडळाच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी स्वागत गीत विद्यालयाच्या संगीत मंच यांनी म्हटले प्रास्ताविक प्राचार्य बीके शेवाळे यांनी व्यक्त करताना विद्यालयाच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष व कांद्याचे संचालक शहाजी दादा सोमवंशी हे होते प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सुभाषराव शिंदे कादवा संचालक मधुकर अण्णा गटकळ संचालक दिनकरराव जाधव संचालक विश्वनाथ देशमुख संचालक दादा पाटील संचालक राजेंद्र गांगुर्डे रामदास पाटील श्री डी बी शिंदे हे उपस्थित होते सर्व उपस्थित यांच्या हस्ते विद्यालयातील 70 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला उपस्थितांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांनी केले विद्यार्थी मनोगत कावळे सृष्टी ज्ञानेश्वर व कुमार दाभाडे यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला शिक्षक मनोगत श्रीमती उफाडे जयश्री नारायण यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष शहाजी दादा सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुरेश सलादे श्रीमती वर्षा दिघे श्री प्रमोद पगारे श्री सुरेश भुसाळ यांनी केले कार्यक्रमात आभार बाळासाहेब वडजे यांनी मानले कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका श्रीमती व्ही आर जाधव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका यांनी परिश्रम घेतले इयत्ता पाचवी ते बारावीचे विद्यार्थी या शिक्षक दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी एक दिवस प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव वर्गात अध्यापन करून घेतले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button