Amalner

Amalner: इंदिरा गांधी विद्या मंदिरात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा

Amalner: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा

अमळनेर येथील इंदिरा गांधी विद्या मंदिर शाळेत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला . सदर प्रसंगी शिक्षकांच्या भूमिकेतील शालेय मुलींनी डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. आणि इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अध्यापन कसे करावे लागते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला . तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती कथन केली . त्यात निकिता पाटील, भाविका निकम, कावेरी पाटील, आवनी इंगळे, दिव्यांनी साळुंखे, वर्षा वैष्णव, दिव्या पाटील, पूनम कोळी, ऋषिका भिल, आरुषी इंगळे, प्रतीक्षा कुंभार, नंदिनी चव्हाण, दिव्या पवार, मानसी शिंपी, सेजल पाटील, वैष्णवी पारगीर, गुंजन पाटील, निशा संदानशिव, प्रमोदिनी चव्हाण आदी मुलींनी सहभाग घेतला . आणि मुख्याध्यापक म्हणून रोशन दीपक पारधी या सातवीच्या विध्यार्थ्याने कामकाज पाहिले .चतुर्थ कर्मचारी म्हणून पुनीत विष्णु पाटील याने काम पाहिले . तद्नंतर उपक्रमशील शिक्षक डी. ए. सोनवणे यांनी डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंग सांगितले . आणि ते एक शिक्षक म्हणून कार्यरत असतांना त्यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून आपल्या देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत म्हणजे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज सांभाळले . ते एक शिक्षक होते म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो . परंतु सर्वांसाठी खरे शिक्षण आणि मुलींसाठी सर्वांगीण शिक्षण सुरू करून त्यात आपले सारे आयुष्य प्राणपणाला लावणारे तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे शिक्षण क्रांती घडवून आणणारे समतेचे दूत आहेत. हे सर्व विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिले . कारण महात्मा जोतीराव फुले हे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापेक्षा साठ वर्षांनी मोठे होते . सदर प्रसंगी मुख्याध्यापक संदीप पवार ,डी. एस. माळी, पी. ए. शेलकर, एम. एस. सुशिर, वाय. जे. पाटील, व्ही. डी. पाटील, ए. पी. जाधव, डी. एस. कारले,आणि ए. यु. महाजन, सी. डी. निकम, पी. पी. पाटील, आर. एम. ताडे, एस. एस. तेले मॅडम उपस्थित होत्या . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आणि सर्व भूमिका साकार करण्यासाठी पी. एम. ठाकरे सर आणि सौ. भारती चव्हाण मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले .कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button